Karj Mafi Maharashtra 2026: कॅबिनेट बैठकीतील मोठा निर्णय, 56 लाख शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी

Karj Mafi Maharashtra 2026 Eligibility

Karj Mafi Maharashtra 2026: महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असून, राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’ला मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मात्र, सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आचारसंहितेची मुदत संपल्यानंतर कर्जमाफीचे सविस्तर निकष जाहीर केले जाणार असले, तरी २० जूनपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कसे जमा करता येतील, यादृष्टीने सरकारने युद्धपातळीवर प्रशासकीय हालचाली सुरू केल्या आहेत.

पुढे तुम्हाला या बद्दल सर्व माहिती पाहायला मिळणार आहे. ती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला माझी शेती ग्रुप जॉइन करा.

नवीन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉइन कराJoin Now

कर्जमाफी योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

  • २ लाखांपर्यंत कर्जमाफी: या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे.
  • ५६ लाख शेतकऱ्यांना फायदा: सूत्रांच्या माहितीनुसार, या योजनेचा थेट लाभ राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  • प्रोत्साहनपर अनुदान: जे शेतकरी वेळेवर आपल्या कर्जाची परतफेड करतात, त्यांना सरकार ५०,००० रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान (Incentive Grant) देणार आहे.
  • पात्रता निकष: ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे थकीत पीक कर्ज या योजनेसाठी पात्र मानले जाणार आहे. Karj Mafi Maharashtra 2026

ही माहिती पहा : Kisan Credit Card Yojana In Marathi: आता शेतकऱ्यांना मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचे स्वस्त कर्ज!

घोषणा का लांबणीवर?

सध्या विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, सरकार या योजनेची अधिकृत घोषणा आत्ताच करणार नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली जाईल. तसेच, आगामी काळात सरकारकडून या योजनेच्या अटी आणि शर्तींबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल.

सरकारवर आर्थिक भार : या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर अंदाजे २५,००० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

ऐन मान्सूनच्या तोंडावर राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी शेती करणे सोपे होणार आहे. Karj Mafi Maharashtra 2026 News

शेअर करा ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांना आणि आणि शेती बद्दल नवीन बातम्या पाहण्यासाठी माझी शेती वेबसाइट ला भेट देत जा. Karj Mafi Maharashtra 2026

ही अपडेट पहा :