Keli Bhav Khandesh Today
Keli Bhav Khandesh Today: खानदेशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुखावणारी बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खानदेशात केळीच्या दराने २३०० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. मागणी वाढल्याने आणि आवक स्थिर असल्याने दरात ही सुधारणा पाहायला मिळत आहे.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपला माझी शेती हा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. त्यावर तुम्हाला अपडेट सर्वात अगोदर मिळत जाईल.
| नवीन अपडेट साठी माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
बाजारपेठेतील सद्यस्थिती (Market Intelligence)
सध्या खानदेशातून दररोज ३८५ ते ४०० ट्रक (१६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि मुक्ताईनगर या मुख्य बाजारपेठांमधून सर्वाधिक म्हणजे २५० ते २६० ट्रक केळी येत आहे. तसेच नंदुरबार, शहादा आणि तळोदा भागातूनही आवक सुरू आहे.
ही अपडेट पहा : Krishi Mitra Bharti 2026: महाराष्ट्र कृषि विभागात ११,५८७ पदांची मेगा भरती, सविस्तर माहिती
दरातील वाढीची प्रमुख कारणे

१. उत्तर भारतातून मोठी मागणी: काश्मीर, दिल्ली आणि पंजाबमधून केळीला प्रचंड मागणी आहे. विशेषतः काश्मीरमध्ये जाणाऱ्या उच्च दर्जाच्या केळीला २३५० रुपये दर मिळत आहे.
२. इतर राज्यांतील आवक घटली: मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशात केळीची आवक कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांची पसंती खानदेशातील केळीला मिळत आहे.
३. उन्हाळ्याचा प्रभाव: सध्या उष्णता वाढल्यामुळे फळांना मागणी वाढली आहे. त्यातच कलिंगड आणि द्राक्षांची आवक कमी झाल्याने केळीचा उठाव वाढला आहे.
४. बऱ्हाणपूर बाजारपेठ: शेजारील मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरमध्येही केळीचे दर २३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. Keli Bhav Khandesh Today
केळी निर्यात (Banana Export Update)
केळीचा दर्जा उत्तम असल्याने आखाती देशांमध्ये निर्यात जोमाने सुरू आहे. इराण वगळता इतर आखाती देशांत खानदेशातून दररोज १३ ते १४ कंटेनर (२० टन क्षमता) केळी पाठवली जात आहे.
ही अपडेट पहा :
