Soybean MSP: शेतकऱ्यांची दिवाळी झाली मातीमोल! हिंगणघाट बाजार समितीमध्ये लुटालूट

Soybean MSP News

Soybean MSP : आता शेतकऱ्यांचे सोयाबीन काढून झाले आहे. एकीकडे पावसाने खरीप पिकांचे उत्पादन घटवले, तर दुसरीकडे बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालवली आहे. याचे एक धक्कादायक उदाहरण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीमध्ये समोर आले आहे. शासनाने सोयाबीनसाठी ₹५,३२८ प्रति क्विंटल इतका हमीभाव (MSP) जाहीर केलेला असताना, या बाजारात सोयाबीनची खरेदी चक्क ₹५०० प्रति क्विंटलच्या कवडीमोल दराने करण्यात आली आहे. तर नेमक काय घडले आहे वाचा पुढे सविस्तर आणि अशाच माहितीसाठी आपला माझी शेती व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

सोयाबीन दर हिंगणघाट बाजार समिति

Soybean MSP

नेमका प्रकार काय घडला?

  • हिंगणघाट तालुक्यातील शेतकरी हरीश कारवटकर यांनी दिवाळीसाठी पैशांची सोय व्हावी म्हणून आपले सोयाबीन हिंगणघाट बाजार समितीत आणले होते.
  • यावर्षी अतिवृष्टीमुळे त्यांचे एकरी उत्पादन अपेक्षित ६-७ क्विंटलच्या ऐवजी खूपच कमी झाले होते. तरीही जेमतेम ६ क्विंटल १३ किलो सोयाबीन त्यांनी बाजारात आणले.
  • पण व्यापाऱ्यांनी सोयाबीनचा दर्जा चांगला नसल्याचे कारण देत, त्यांना हमीभावाच्या अगदी उलट, फक्त ₹५०० प्रति क्विंटलचा दर दिला.
  • हमाली आणि इतर खर्च वजा जाता, शेतकऱ्याला त्यांच्या संपूर्ण ६ क्विंटल सोयाबीनसाठी केवळ ₹२,९१४ रुपये मिळाले!

ही बातमी वाचा : Farmer Support: अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक नष्ट झालेल्या धानोरा काळे येथील शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

लाखाचं नुकसान, हजारोचा खर्च!

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

शेतकऱ्याला सोयाबीनच्या एका एकरावर व्यवस्थापनासाठी सुमारे ₹९,००० ते ₹१०,००० खर्च आला आहे. इतका मोठा खर्च करून आणि अतिवृष्टीत तग धरूनही, जेव्हा बाजारात अशा प्रकारे लूट होते, तेव्हा शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बाजार समितीवर प्रश्नचिन्ह

बाजारातील अनागोंदीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या बाजार समित्याच या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. सरकारने या लुटीची तातडीने दखल घेऊन, बाजारात बाजार सनियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. Soybean MSP

ही बातमी वाचा :