Tandul lagwad in Marathi
Tandul lagwad in Marathi: मित्रांनो तांदूळ या पिकाची भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. आणि या लेखामध्ये आपण (Tandul lagwad in Marathi) तांदूळ लागवडीची पूर्ण माहिती पाहणार आहोत. की कशा प्रकारे या पिकाची लागवड केली जाते व कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याची माहिती देखील आपण पाहणार आहोत.
भाताचा वापर रोजच्या खाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. तांदुळापासून भात, भाकरी, पापड, मोदक असे बरेच पदार्थ केले जातात. दक्षिण भारतामध्ये तांदळाचा वापर खाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. तांदूळ मध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात जे की आरोग्यासाठी चांगले असतात. तर चला पुढे Tandul lagwad Information in Marathi याची पूर्ण माहिती पाहूया.
माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
तांदूळ लागवड जमीन

कोणत्याही पिकाची लागवड करताना महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पिकासाठी पोषक जमीन असणे. तर तांदूळ या पिकासाठी कशी जमीन असली पाहिजे ते तुम्ही पुढे पाहू शकता.
- तांदूळ ह्या पिकाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये होऊ शकते.
- पण पोयटा व चिकनमातीयुक्त जमिनीमध्ये तांदळाचे उत्पन्न चांगले येते.
- ज्या जमिनीचा सामू 5-8 या दरम्यान असतो अशा जमिनी मधून चांगले उत्पन्न मिळते.
- ज्या जमिनीमध्ये पाणी साचून राहत नाही आणि द्रावणीय नसलेल्या चिकन माती तांदूळ लागवडीसाठी सर्वोत्तम मानली जाते.
हेही वाचा : Kanda Lagwad Mahiti in Marathi: कांदा लागवड करण्याची उत्तम पद्धत; नक्कीच होईल फायदा
पोषक हवामान
आवश्यक हवामान :
- तांदूळ हे उष्णकटिबंधातील पीक आहे.
- तांदूळ पिका साठी दमट आणि उष्ण हवामानाची गरज असते.
- तांदूळ पेरणी करत असताना सरासरी तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस एवढे असावे.
- पिकाच्या वाडीच्या कालावधी मधील सरासरी तापमान 24 ते 32 अंश सेल्सिअस असावे.
- पिकाचे उत्पन्न चांगले घेण्यासाठी हवेतील आद्रता 65 टक्के असावी.
- तांदुळ या पिकासाठी वार्षिक पर्जन्यमान 1000 मिमी पेक्षा जास्त लागतो.
- पुरेसा पाऊस आणि सिंचनाचे योग्य नियोजन केल्यावर तांदूळ या पिकाचे चांगले उत्पन्न येते.
Rice Variety (तांदूळ प्रमुख जाती)
जर तुम्हाला पण तांदूळ या पिकाची लागवड करायची असेल तर तांदळाच्या काही महत्वाच्या जाती आहेत. त्या पाहणे आवश्यक आहे. कारण तुमच्या भागामध्ये कोणती जात चांगल्या प्रकारे वाढू शकते ते पाहणे आवश्यक आहे. पुढे तांदळच्या जाती दिल्या आहेत. त्या पहा.
पी आर 128
या जातीचे तांदूळ लांब पातळ पारदर्शक असतात. त्यांची सरासरी रोपांची उंची 110 सेमी पर्यंत असते. लावणी केल्यानंतर सुमारे 110 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी परिपक्व होते. पंजाब राज्यांमध्ये सध्या प्रचलित असलेल्या जिवाणूजन्य करपा रोगाला ही जात प्रतिरोधक आहे. या जातीपासून सरासरी एकरी 30 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते. Tandul lagwad in Marathi
पी आर 129
या जातीची लावणी केल्यानंतर सुमारे 108 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. रोपांची सरासरी उंची 165 सेंटिमीटर पर्यंत असते. दाणे लांब पातळ पारदर्शक असतात. पंजाब राज्यामध्ये पसरलेल्या दहा जिवाणूजन्य करपा रोग जनकांना प्रतिरोधक असून या जातीपासून देखील एकरी 30 क्विंटरपर्यंत उत्पन्न मिळते. Tandul lagwad in Marathi
एच के आर 47
ही जात मध्यम लवकर परिपक्व होणारी जात आहे. सरासरी लावणीनंतर 104 दिवसांमध्ये पीक परिपक्व होते. रोपांची सरासरी उंची 117सेमी पर्यंत असते. बॅक्टेरियल ब्लाइंड या रोगासाठी संवेदनशील असून जमिनीमध्ये चांगली तग धरते. या जातीपासून सरासरी प्रति एकरी 29 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.
पी आर 111
ही जात कमी उंचीची पसरलेली जात आहे. या जातीची पाने दाट आणि गडद हिरव्या रंगाचे असतात. लावणी केल्यानंतर 135 दिवसांमध्ये पीक काढणीला येते. या जातीचे दाणे लांब बारीक आणि स्पष्ट असतात. ही जीवाणूजन्य करपा रोगासाठी प्रतिरोधक असून सरासरी 27 क्विंटल एकरी उत्पन्न देते.
पी आर 113
लावणी केल्यानंतर ही जात 142 देशांमध्ये काढण्यासाठी तयार होते. या जातीचे तांदूळ जाड असतात. जीवाणूजन्य करपा रोगाला ही जात प्रतिरोधक असून रोपांची उंची कमी असते. या जातीपासून सरासरी 28 क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न मिळते.
पी आर 114
ही जात अर्ध बटू कडक पसरलेली जात आहे. या जातीची पाने अरुंद गडद हिरव्या रंगाची असतात. लावणी नंतर 145 दिवसांमध्ये पीक तयार होते. दाणे जास्त लांब पारदर्शक असतात खाण्यासाठी ही जात खूप चांगली मानली जाते. या जातीपासून सरासरी 27.5 क्विंटल एकरी उत्पन्न मिळते. Tandul lagwad in Marathi
सी एस आर 30
या जातीमध्ये जास्त लांब पातळ आकाराचे दाणे असतात. खाण्यासाठी खूप चांगले लागतात ही जात लावनी नंतर 142 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून एकरी सरासरी 13.5 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.
हेही वाचा : Bhendi Lagwad Mahiti in Marathi: सुधारित भेंडी लागवड फायद्याची; पहा पूर्ण माहिती
पंजाब बासमती 3
Tandul lagwad in Marathi : ही जात पंजाब एग्रीकल्चर यूनिवर्सिटी लुधियाना येथे विकसित केलेली आहे. ही जात बॅक्टेरियल करपा या रोगासाठी प्रतिरोधक असून या जातीचे दाणे जास्त लांब असतात. त्यांना उत्कृष्ट असा सुगंध असतो. या जातीपासून एकरी सरासरी 16 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.उत्कृष्ट सुगंध असल्यामुळे या जातीला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. Tandul lagwad in Marathi
पंजाब बासमती 4
या जातीपासून चांगले उत्पन्न मिळते. ही जात अर्ध बटू जात आहे या जातीची उंची 96 सेंटीमीटर असून जिवाणू-कर्पाला प्रतिरोधक आहे. ही जात पुनलागवड केल्यानंतर 146 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून 17 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळते.
पुसा पंजाब बासमती
ही जात देखील लवकर परिपक्व होते. या जातीची लावणी केल्यानंतर 120 दिवसांमध्ये पिक कापण्यासाठी तयार होते. या जातीपासून सरासरी 15.7 क्विंटल पर्यंत विक्री उत्पादन मिळते.
तर मित्रांनो या आहेत तांदूळाच्या महत्वाच्या जाती.
तांदूळ शेती पूर्वमशागत
सर्वात महत्वाचे काम म्हणजे शेतीची पूर्व मशागत. तर तांदूळ शेती करण्यापूर्वी शेतीची कशा पद्धतीने मशागत केली पाहिजे याची पूर्ण माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.
- पूर्व पीक काढणी नंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हिरवळीचे खत जसे धैंचा किंवा सन्हेंप 20 किलो एकरी किंवा चवळी 12 किलो प्रति एकरी या प्रमाणामध्ये लावली जाते.
- जेव्हा पीक सहा ते आठ आठवड्याचे असेल तेव्हा त्याला नांगरटीच्या सहाय्याने जमिनीमध्ये गाढले जाते.
- दुसऱ्या नांगरणीपूर्वी जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून घ्यावे.
- पाण्याचे नियोजन करून चिखलणी करावी.
- चिखलणी वेळी देखील आपण हिरवळीचे खत शेतामध्ये मिसळू शकतो. Tandul lagwad in Marathi
तांदूळ रोपवाटिका मशागत
तांदूळ शेतीच्या अगोदर केली जाते तांदूळ रोपवाटिका. म्हणजेच कांद्या प्रणामे रोप तयार करणे. तर कशा पद्धतीने तांदळाचे देखील रोप बनवले जाते त्याची माहिती पुढे पहा.
- रोपवाटिका करण्यासाठी पहिल्यांदा जमीन नांगरून ढेकळे फोडावेत आणि जमिनीमध्ये चांगले शेणखत मिसळून घ्यावे.
- त्यानंतर उंच निचऱ्याच्या जागी तळाशी 120 सेमी व पृष्ठभागी 90 सेमी रुंदीचे सात ते दहा सेंटिमीटर उंचीचे जमिनीच्या उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत.
- वाफ्यावर रुंदीस समांतर दहा सेंटिमीटर अंतरावर ओळीमध्ये साधारण 2.5 सेंटीमीटर खोलीवर बी पेरावे आणि ते मातीने झाकून द्यावे.
- भाताच्या जाड दाण्याच्या जाती करीत आहेत तरी 50 ते 60 किलो ग्रॅम पर्यंत बियाणे लागतात आणि बारीक दाण्यांच्या जाती करता हेक्टरी 35 ते 40 किलोग्रॅम बियाणे लागतात.
- संकरित जातींसाठी हेक्टरी 20 किलोग्राम बियाणे पुरतात.
- लावणी : खरीप हंगामामध्ये 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची पाच ते सहा निरोगी फुटलेली पाने जातींच्या पक्वता कालावधीनुसार 21 ते 27 दिवसांची रोपे लावण्यासाठी वापरली जातात.
- रब्बी हंगामामध्ये पेरणीनंतर सुमारे 35 ते 40 दिवसांनी रोपे लावले जातात.
- रोपे उपटण्यापूर्वी दोन दिवस आधी पाणी द्यावे.
- भात पिकाची पुन लागवड करण्यासाठी चिखलणी केली जाते.
- चिखलणी नंतर फळी मारून जमिनीच्या पृष्ठभाग समपातळीत आणावा म्हणजे.
- शेतात सर्वत्र पाण्याची पातळी सारखी ठेवता येते.
- जमिनीच्या मगदूराप्रमाणे लावणी ही पंधरा सेंटीमीटर× 15 सेंटिमीटर किंवा 20 सेंटीमीटर×वीस सेंटीमीटर एवढे अंतर ठेवून केली जाते.
- उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात, एका चुडात तीन रोपे लावावेत संकरित भातासाठी एका चुडामध्ये दोन रोपे लावले जातात. Tandul lagwad in Marathi
तांदूळ शेती आंतरमशागत आणि पाणी नियोजन

तांदूळ शेती करताना त्या पिकासाठी पानी नियोजन कशा पद्धतीने केले पाहिजे जेणेकरून पीक चंगल्या प्रकारे वाढ होऊन चांगले उत्पन्न मिळेल. तर त्याची माहिती पुढे दिली आहे. `
- तन प्रादुर्भाव झाला असल्यावर लावली नंतर चार दिवसानंतर कोळपणी करून शेताची मशागत करावी.
- लावणी नंतर पहिला 30 दिवसांपर्यंत शेतामध्ये पाण्याची पातळी 2.5 ते 5 सेमी पर्यंत ठेवावे म्हणजे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- लोंब्या येण्यापूर्वी 10 दिवस व लोंब्या आल्यानंतर देखील दहा दिवसांपर्यंत शेतामधील पाण्याची पाते 10 सेंटीमीटर पर्यंत ठेवावी.
- भात पिकाचे दाणे भरेपर्यंत पाण्याची पातळी 5 सेमी पर्यंत असावी.
- त्यानंतर कापणीच्या अगोदर आठ ते दहा दिवस शेतातील पाणी काढावे. Tandul lagwad in Marathi
तांदूळ कीड व रोग नियंत्रण
कोणतेही पीक तेव्हाच चांगले येते जेव्हा त्या पिकाचे कीड व रोग नियंत्रण योग्य प्रकारे केले जाते. तर तांदूळ शेती करत असताना तांदूळ पिकावरील कीड व रोग नियंत्रण कशा पद्धतीने केले पाहिजे त्याची माहिती पुढे दिली आहे.
1.खोड कीड :
या किडीचे पतंग पिवळसर असतात. पहिल्यांदा अळी कोवळ्या पानांवर उपजीवका करतात नंतर खोडामध्ये शिरून आतील भाग खाण्यासाठी सुरुवात करते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झाला तर मधला भाग वरून खाली सुकत येतो. याला गाभा मर असे म्हणतात. जर पीक पोटरीवर आल्यानंतर पडली तर दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात याला पाळींज असे म्हणतात. या किडीवर सर्व पद्धतींचा एकत्रितपणे अवलंब केला जातो. पिक काढणीनंतर शेत नांगरून त्यामध्ये सर्व धसकटे जाळून टाकावे. तसेच पिकांची काढणी जमिनीलगत करावी तसेच बेडकांचे संवर्धन करावे. शेतामध्ये प्रादुर्भाव जास्त दिसत असल्यास जैविक कीटकनाशकांची फवारणी पिकाला करावी. Tandul lagwad in Marathi
2. गाद माशी :
ही अळी आकाराने डासासारखी दिसते आणि गुलाबी रंगाचे असते आणि रोपाच्या आत शिरून अंकुर कुरतडते, त्यामुळे अळीच्या भुतलाचा अंकुराचा भाग आणि त्याची कांद्याच्या पातीसारखी नळी तयार होते. ही नळी पांढरट पिवळसर रंगाची असते याला नळ किंवा पोंगा असे म्हणतात. रोपांची वाढ खुंटते रोप चांगले वाढत नाही. कीड प्रतिकारक जाती चा वापर करावा. शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव नियंत्रण करावा. प्रादुर्भाव जास्त वाढल्यानंतर जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी. Tandul lagwad in Marathi
3. तपकिरी तुडतुडे :
तुडतुडे व त्यांची पिल्ले भाताच्या खोडातील अन्न रस शोषून घेतात परिणामी भाताची पाने पिवळी पडतात आणि नंतर वाळून जातात. विशेषतः शेताच्या मध्यभागी ठिक ठिकाणी तुडतड्याने करपून गेलेले गोलाकार भाताचे पीक दिसते. अशा रोपामधून लोंब्या बाहेर पडत नाही. जर पडला तर त्यांचे दाणे पोचट असतात. त्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. पाण्याचा उत्तम निचरा होईल याची योग्य काळजी घ्यावी. जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी. Tandul lagwad in Marathi
4. पाने गुंडळणारी अळी :
अंड्यातून नुसतीच बाहेर पडलेली आळी पांढरट हिरव्या रंगाची असते व पूर्ण वाढलेली आणि पिवळसर हिरवट रंगाचे असते.अळी नेहमी पानाच्या गुंडाळ्या करत राहते गुंडाळी स्पर्श केल्यास अळी अतिशय जलद गतीने त्यातून बाहेर पडते आणि आपल्या शरीराची वेडी वाकडे हालचाल करते. अळी पानाच्या दोन्ही कडा एकत्र चिकटवून पानाची गुंडाळी करते आणि त्यामध्ये उदरनिर्वाह करते. अळी आतील पृष्ठभागातील हरितद्रव खाते. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.
तांदूळ पिकावरील रोगाची माहिती

करपा : या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी आणि रोगप्रतिकारक्षम जातींचा वापर करावा. Tandul lagwad in Marathi
तांदूळ कापणी आणि उत्पादन (Rice harvesting and production)
Rice harvesting and production : तांदूळ पिकाची कंपनी आणि उत्पादन कशा प्रकारे घेतले जाते त्याची माहिती पुढे दिली आहे.
- या पिकाची कापणी सुमारे 90% दाने पिकल्यावर आणि रोपे हिरवट असतानाच जमिनीलगत केली जाते.
- त्यानंतर दोन ते तीन वेळा ऊन दाखवून धान्य सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवली जाते.
- भाताचे उत्पन्न हे जमिनीची निवड, पाण्याचे योग्य नियोजन, कीड व रोग नियंत्रण, जातींची निवड या गोष्टींवर अवलंबून असतो.
- भारताचे सरासरी उत्पन्न 12 ते 15 क्विंटल एकरी मिळते. Tandul lagwad in Marathi
तुम्ही तांदूळ ची शेती करता का? कशाप्रकारे करता? Tandul lagwad in Marathi ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या माझी शेती या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यायला अजिबात विसरू नका.
या पिकाच्या शेतीची माहिती वाचा :