Rain Alert on Diwali
Rain Alert on Diwali : आत्ताच तर कुठे पावसाने राज्यात सुटमोकळ दिली होती आणि लोक पुनः शेतीच्या कामाकडे आणि पेरणीकडे लागले होते. पान आता दिवाळी मध्ये पुनः काही ठिकाण साठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. कारण अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ शनिवारी (दि. 18) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळी सणावर पावसाचे सावट पसरले आहे.
वाचा सविस्तर बातमी पुढे आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला माझी शेती व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा. जेणेकरून शेती संबंधी लेटेस्ट अपडेट तुम्हाला थेट तुमच्या मोबाइल मध्ये मिळत राहतील.
| माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
पाऊस कधी होणार आहे

लक्षद्वीपजवळ केरळ व किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, त्याची तीव्रता वाढत जाणार आहे. हे क्षेत्र उत्तर-पश्चिमेकडे प्रवास करण्याचा अंदाज आहे. याच्या प्रभावामुळे केरळ, तामिळनाडू तसेच पुद्दुचेरीमध्ये पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे; तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे. सोमवारी (दि. 20) मराठवाड्यात ‘यलो अलर्ट’ आहे.
ही बातमी वाचा : Ativurshti Anudan: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी रब्बी पिकांच्या अनुदानाचे वितरण वेगात; प्रति हेक्टरी 10,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
मान्सूनचा निरोप : नैर्ऋत्य मोसमी पावसाने गुरुवारी देशाचा निरोप घेतला. यावर्षी पावसाने भरभरून पडला आहे. ईशान्य मोसमी पाऊस लवकरच दक्षिणेकडे दाखल होणार आहे.
ऑक्टोबरमध्ये पाऊस : राज्यात 21 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे दिवाळी सणावर पावसाचे सावट पसरले आहे. 23 ते 30 ऑक्टोबरच्या आठवड्यात विदर्भ वगळता राज्यात पावसाची शक्यता आहे. Rain Alert on Diwali Maharashtra
ही बातमी वाचा :
