Pik Vima Bharpai: पीक विमा भरपाईचे 3720 कोटी रुपये मिळणार, शेतकऱ्यांना मिळाले 3126 कोटी.

Pik Vima Bharpai News

Pik Vima Bharpai: मित्रांनो खरीप हंगाम 2024 मध्ये विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण शासनाने एकूण 3720 कोटी रुपयांचा विमा भरपाईला मंजुरी दिली असून, त्यामधून 3126 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.

9 मे पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आणि आणखी 307 कोटी रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा करण्यात येणार आहेत. आणि उरलेले 288 कोटी रुपये राज्याने विम्याच्या दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे. जर तुम्ही गेल्या वर्षीचा पिक विमा भरला असेल तर तुम्हाला पिक विमा जमा झाला आहे की नाही हे नक्कीच चेक करा.

ही माहिती वाचा : Bhendi Lagwad Mahiti in Marathi: सुधारित भेंडी लागवड फायद्याची; पहा पूर्ण माहिती

सध्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील वेगवेगळ्या ट्रिगर मधून भरपाई मंजूर करण्याचे काम जोरात सुरू आहे. आणि राज्य सरकारने आपल्या आयुष्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर मधून भरपाई जमा केली जात आहे.

त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना एकूण चार ट्रिगर मध्ये म्हणजेच 9 एप्रिल पर्यंत तीन हजार 720 कोटी रुपये पिक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

आणि यामधून आता उरलेले पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिक विम्याच्या नेमकं चार जोखीम बाजू कोणत्या आहेत त्या पुढे पहा.

  • 2720 कोटी स्थानिक आपत्तीमधून मिळणार आहे.
  • 713 कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती मधून मिळणार आहेत.
  • 270 कोटी प्रशांत नुकसान त्याचे मिळणार आहे.
  • 18 कोटी रुपये पीक कापणी प्रयोग आधारित वर मिळणार आहेत.

एकूण वितरित नुकसान भरपाई

Pik Vima Bharpai
Pik Vima Bharpai

आतापर्यंत शेतकऱ्यांना 2418 कोटी स्थानिक आपत्ती या ट्रिगर मधून खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत आणि 708 कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर मधून जमा करण्यात आले आहेत. जर तुम्हाला अजून पीक विम्याचे पैसे आले नसतील तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.

ही माहिती तुमच्या इतर सर्व शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पिक विमा भरपाईची माहिती मिळेल. आणि शेती बद्दल अशाच अपडेट रोज पाहण्यासाठी आपल्या माझी शेती वेबसाईटला अवश्य भेट देत जा. तसेच अपडेट डायरेक्ट मोबाईल वरती मिळवण्यासाठी आपल्या खाली दिलेल्या ग्रुपला जॉईन करा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

ही माहिती वाचा :

Thank You!