Pesticide Spraying: कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी घ्यावी ही काळजी? नाहीतर होईल विषबाधा

Pesticide Spraying Farmers Maharashtra

Pesticide Spraying : मित्रांनो सध्या राज्यामध्ये शेतकरी पिकांवर फवारणीचे काम करत आहे. पण दरवर्षी कीटकनाशक फवारणी करताना अनेक शेतकऱ्यांना विषबाधा होते. तर आज आपण पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी. याची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला शेती संबंधी अशाच महत्वाच्या माहिती हवी असेल तर आपला माझी शेती ग्रुप लगेच जॉइन करा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?

तर आज आपण पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी. याची माहिती जाणून घेणार आहेत. जेव्हा आपण पिकांवर तणनाशक किंवा कीटकनाशक फवारणी करत असतो त्यावेळई उपाशीपोटी राहणे किंवा तंबाखू, धूम्रपान, मद्यपान करून विषारी कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी दरम्यान हात स्वच्छ धुवावे, फवारणी झाल्यानंतरच तोंडाला स्पर्श करावा.

जेव्हा आपण फवारणी करतो त्यावेळी तंबाखू चोळणे, किंवा जेवण करणे धोकादायक ठरू शकते. यातून विषबाधा होण्याचा धोका अधिक असतो. फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या रेड मार्क असलेली कीटकनाशके अत्यंत विषारी मानली जातात. अशा रसायनाचे फवारणी करताना त्याचा मानवी शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे होईल तेवढी काळजी घेणे गरजेचे असते.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

त्यामुळे शेतकऱ्यांनी संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस जेवण करूनच फवारणी करावी. फवारणी करताना सुरक्षेची साधने जसे की मास्क, ग्लोव्हज, गॉगल्स हे वापरणे गरजेचे आहे. फवारणी ही संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस करावी.
फवारणी करताना नळी मध्ये घाण अडकली तर तोंडाने फुंकर मारू नये. त्यामुळे कीटकनाशक तोंडात जाऊन विषबाधा होण्याची शक्यता असते. Pesticide Spraying

विषबाधेची लक्षण कोणती?

डोळ्याची किंवा त्वचेची जळजळ, उलटी होणे किंवा चक्कर येणे, श्वास घेण्यास अडचण, थकवा किंवा पोटदुखी हे विषबाधेची सामान्य लक्षणे आहेत. अशी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास शेतकऱ्यांनी त्वरित दवाखान्यात जावे. उपचारासाठी जाताना ज्या कीटकनाशकाची फवारणी केली आहे त्याची बॉटल सोबत घेऊन जावे जेणेकरून योग्य उपचार करता येईल. Pesticide Spraying

शेअर करा ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत आणि अशाच माहितीसाठी आपल्या माझी शेती वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

हे पहा :