Mirchi Lagwad Mahiti In Marathi
Mirchi Lagwad Mahiti In Marathi : मित्रांनो हा लेख शेतकरी बांधवांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण रोजच्या दिनचर्या मध्ये मिरची चे महत्व आणि त्याचे नवनवीन वाण तसेच दिवसेंदिवस होणाऱ्या सुधारित तंत्रज्ञान मुळे मिरचीच्या उत्पन्न मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मिरची एवढी का महत्वाची आहे? तर मिरची मध्ये माणसाच्या शरीरसाठी लागणारे अ आणि क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणामद्धे आहेत.
तसेच मिरची मध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मिरची ही खूप महत्वाची आहे. तर पुढे आपण या लेखामध्ये मिरची च्या लागवडी बद्दलची सर्व माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत. जेणेकरून जर तुम्हाला मिरची चे पीक घेण्यासाठी चांगली मदत होईल. आणि योग्य ते मार्गदर्शन मिळेल. Mirchi Lagwad Mahiti
Best Variety of Chilli in Maharashtra

मिरचीच्या जाती (Chili varieties) : मित्रांनो आपण सर्वात आधी मिरचीच्या एकूण किती जाती आहेत. त्याची माहिती बघूया. कारण मिरचीच्या जातीवर त्यांचे उत्पन्न अवलंबून असते. मिरचीच्या सुधारित जाती पुढील प्रमाणे आहेत.
तर मित्रांनो महात्मा फुले कृषि विद्यापीठाने मिरचीच्या मुसळवाडी सिलेक्शन, फुले सई, अग्निरेखा, फुले ज्योति, फुले रेखा, फुले मुक्ता, फुले सूर्यमुखी इत्यादि सुधारित जाती विकसित केल्या आहेत. तर आता आपण पुढे या प्रत्येक जाती ची माहिती सविस्तर पणे पाहणार आहोत. Mirchi Lagwad Mahiti
मिरचीच्या टॉप व्हरायटी :
- मुसळवाडी सिलेक्शन : मिरचीची ही जात अधिक तिखट असून महाराष्ट्रात लोकप्रिय आहे.
- अग्निरेखा : जर मिरचीचे अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर ही जात उत्तम आहे कारण यामध्ये अधिक उत्पन्नासोबतच तिखटपणा देखील आहे.
- फुले सई : या जातीची मिरची विशेषतः रंग आणि चवीसाठी ओळखली जाते.
- फुले ज्योती : कमी पाणी आणि अधिक तिखटपणा या जातीच्या मिरचीमध्ये आढळून येतो.
- पंत सी – 1 : ही जात रोगप्रतिकारक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे.
- जी – 4 : ही जात उच्च उत्पादन आणि कमी रोगप्रवण जात आहे.
मिरची लागवडीसाठी कोणती जात व वाण चांगला आहे?
मित्रांनो जर तुम्ही पण मिरची लागवडीचा विचार करत असाल तर मिरची लागवडीसाठी विविध प्रकारच्या जाती आणि वाण निवडले जातात. आणि मिरची लावताना मिरचीची जात किंवा वाहन आणि त्यामधून मिळणारे उत्पादन, त्याची रोगप्रतिकारक क्षमता, चव, रंग आणि हवामानाच्या अनुकूलतेचा विचार करावा लागतो.
त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मिरची लागवडीच्या (Mirchi Lagwad Mahiti) आधी या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळेच पुढे मातीच्या, हवामानाच्या दृष्टीने योग्य वाण कसा निवडायचा याची पूर्ण माहिती पुढे दिली आहे.
अग्निरेखा मिरची

अग्निरेखा ही जात प्रामुख्याने दोंडाईचा आणि ज्वाला या दोन जातींच्या संकरातून निवड पद्धतीने तयार केलेली आहे. या जातीची झाडे मध्यम उंचीचे असतात. उन्हाळी आणि खरीप हंगामात लागवडीसाठी (Mirchi Lagwad Mahiti) उपयुक्त अशी ही जात आहे. त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात पण आणि खरीप हंगामामध्ये पण या मिरचीची लागवड करू शकतात. लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. या जातीमध्ये वाळलेल्या लाल मिरचीचा उतार कमी मिळतो.
हिरव्या मिरचीचा रंग पोपटी रंगाचा असतो. आणि जर या जातीच्या उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर हिरव्या मिरचीचे हेक्टरी 100 ते 120 क्विंटल आणि वाळलेल्या मिरचीचे 20 ते 25 उत्पादन मिळते.
फुले ज्योती मिरची
मधील फुले ज्योती ही देखील प्रमुख जात आहे. या मिरचीचे फळे घोषात लागतात. आणि प्रत्येक घोषामध्ये सरासरी चार ते पाच मिरच्या असतात. आणि मिरचीची लांबी ही सहा ते सात सेंटीमीटर पर्यंत असते मिरचीचा रंग गर्द हिरवा असून पिकल्यानंतर तो लाल होतो. हिरव्या मिरचीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 180 ते 255 क्विंटल पर्यंत मिळते. त्यामुळे उत्पादनासाठी ही मिरचीची जात खूप चांगली आहे.
ही जात मुख्यतः मिरच्या वरती पडणारा भुरी रोग असतो त्याला कमी बळी पडते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.
फुले सई मिरची

फुले सई : या जातीची पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लागवड (Mirchi Lagwad Mahiti) केली जाते. ही जात पंत सी-1 आणि कमांडर या दोन वाहनांच्या संक्रांमधून निवड पद्धतीने विकसित केलेले आहे. या जातीची झाडे मध्यम उंचीचे असतात. क्षेत्रामध्ये 13 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर वाळलेल्या मिरचीचे उत्पादन यामधून मिळते.
मुसळवाडी सिलेक्शन
मुसळवाडी सिलेक्शन ही मिरचीची जात महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे कारण ही मिरची अत्यंत तिखट आहे. आणि यामध्ये उत्पादन देखील चांगले असते. या मिरचीचा उपयोग मुख्यतः मसाले तयार करण्यासाठी केला जातो.
पुसा ज्वाला
ही मिरची मुख्यतः उत्तर भारतात प्रसिद्ध असलेली जात आहे आणि ही महाराष्ट्रातही उत्तम कामगिरी करते. या मिरचीचे उत्पादन मध्यम ते जास्त मिळते. आणि ही मिरचीचा तिखटपणा मध्यम असल्यामुळे ती विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरली जाते.
पंत सी-1
ही जात रोगप्रतिकार असून या मिरचीमध्ये तिखटपणा चांगला आहे. आणि जर उत्पादन बघितले तर उत्पादन हे उत्तम असते. ही मिरची मसाले तयार करण्यासाठी तसेच खाद्यपदार्थांमध्ये देखील वापरली जाते.
ही बातमी पहा : Kesar Mango Export to America: शेतकरी झाला मालामाल; नांदेडच्या केसर आंब्याचा अमेरिकेत घमघमाट! पहा येथे
संकेश्वरी 32
या जातीची मिरची आकाराने मोठी आणि तिखट असते. आणि बाजारामध्ये या मिरचीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे कारण ही मिरची आकर्षक आणि तिखट आहे. या मिरचीचा उपयोग मुख्यतः मसाले तयार करण्यासाठी केला जातो.
जी-4 मिरची
मिरचीची ही जात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड (Mirchi Lagwad Mahiti) केली जाते. आणि यामध्ये उत्पादन खूप चांगले असूनही मिरची रोगप्रतिकार आहे. त्यामुळे शेतकरी या मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात तसेच या मिरचीचा वापर घरगुती आणि व्यापारासाठी देखील केला जातो.
परभणी टॉल
या मिरचीची जाती महाराष्ट्रातील परभणी भागात विकसित केलेले आहे त्यामुळे तिला त्या भागातील हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे परभणी मधील लोक या मिरचीचे मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. या जातीचे उत्पादन मध्यम ते उच्च आहे. आणि या जातीची रोगप्रतिकार क्षमता चांगली असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव असला तरी पण नुकसान कमी प्रमाणात होते. Mirchi Lagwad Mahiti
कोकणक्रांती
कोकणक्रांती ही कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लावली जाती. या जातीचे उत्पादन चांगले आहे आणि उष्ण आणि आर्द्र हवामानामध्ये चांगली वाढ होते. चवीला तिखट आसल्यामुळे या मिरचीचा स्वयंपाक मध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.
अशा या मिरचीच्या काही मुख्य जाती आहेत या मिरचीची लागवड करताना आपल्या क्षेत्रातील हवामान, बाजारामध्ये असणारी मागणी आणि उपलब्धता याचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. तर पुढे आपण आता मिरची लागवडीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
दर हेक्टरी प्रमाण :
मिरचीच्या लागवडीसाठी बियाणांचे दर हेक्ट्री प्रमाण खूप महत्त्वाचे आहे. साधारणपणे एक हेक्टर क्षेत्रासाठी एक ते दीड किलो बियाणांची आवश्यकता असते. आणि रोपांची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर झाल्यावर त्यांना शेतात प्रत्यारोपण करावे. बियाणांचे दर योग्य प्रमाणात जर ठेवले नाही तर पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. Mirchi Lagwad Mahiti
शेतीची पूर्व मशागत :
मिरची लागवड करण्यापूर्वीची सगळ्यात मुख्य प्रोसेस म्हणजे शेतीची पूर्व मशागत करणे. जमिनीच्या खोदकाम करून ते मोकळे करावे आणि त्यानंतर सेंद्रिय खते मिसळून जमीन लागवडी योग्य बनवावी. आणि पानी देऊन जमिनीचा पोत सुधारावा.
मिरची लागवड करण्याची पद्धत

जर मिरची लागवड करायची असेल तर सुरुवातीला बियाणांची निवड करणे आवश्यक आहे. त्यानंतर बियाणे लागवडीसाठी सरळ शेतामध्ये लागवड न करता त्याची लागवड रोपवाटिकेत केली जाते. पुढे तुम्हाला मिरची लागवडीच्या काही मुख्य पद्धती दिले आहेत त्या पहा.
- बियाणे पेरणी : सर्वात अगोदर तुम्हाला जी मिरची लावायची आहे ते बियाणे निवडून 24 तास पाण्यात भिजून ठेवावेत. आणि पंधरा ते वीस दिवसांनी तयार झालेले रोपे शेतात लावले जातात.
- जमीन तयार करणे : शेत नांगरट करून मोकळे करावे आणि त्यामध्ये सेंद्रिय खते मिसळावीत.
- प्रत्यारोपण : प्रत्यारोपण म्हणजेच जेव्हा रोपे आठ ते दहा सेंटिमीटर लांबीची होता तेव्हा ते रोपे शेतामध्ये 45 ते 60 सेंटिमीटर अंतरावर लावावेत.
- पानी देणे : रोपे रोपे लावल्यानंतर सुरुवातीला रोपांना नियमित पाणी देणे आवश्यक आहे. आणि एकदा का रोपे चिटकली की पाणी देण्या मधील अंतर वाढवले तरी चालते.
- खत व्यवस्थापन : मिरचीचे उत्पादन घेताना खत व्यवस्थापन खूप आवश्यक आहे. कारण मिरचीच्या निरोगी वाढीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खते योग्य प्रमाणात वापरले तर उत्पादन चांगले मिळते.
Summer Chilli Cultivation (उन्हाळी मिरची लागवड)
उन्हाळी मिरची लागवड : उन्हाळी मिरची लागवड (Mirchi Lagwad Mahiti) कशा पद्धतीने केली जाते याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.
- हंगामाचा कालावधी :
- लागवडीचा काळ (Mirchi Lagwad Mahiti) : जानेवारी ते फेब्रुवारी.
- काढणीचा काळ : मे – जून
- तापमान : 25°c ते 35°c
- उत्तम जाती :
- अग्निरेखा, पुसा ज्वाला, फुले सई, फुले ज्योती, जी-4. या जाती उन्हाळ्यामध्ये चांगल्या वाढतात आणि रोगप्रतिकारक्षमता चांगले आहे.
- खते (Fertilizers) :
- पूर्व मशागत खत : शेणखत दहा ते बारा ट्रक प्रति हेक्टर वापरावे.
- रासायनिक खते : रोपाच्या लागवडीनंतर 50 किलो नायट्रोजन, 25 किलो फॉस्फरस, आणि 25 किलो पोटॅशियम प्रति हेक्टर द्यावे.
- आणि नंतरच्या वाढीच्या टप्प्यांवर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने खतांचा पुरवठा करावा.

- पानी व्यवस्थापन : उन्हाळ्यामध्ये मिरचीला पाण्याची गरज जास्त असते त्यासाठी नियमित ठिबक सिंचन वापरणे सगळ्यात उत्तम आहे कारण यामुळे पाण्याची बचत पण होते आणि पिकाला हवे तेवढे पाणी पण मिळते.
- रोग आणि किड नियंत्रण :
- उन्हाळ्यातील उष्णतेमुळे मावा आणि फुलकिडे यांचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यासाठी योग्य कीटकनाशक फवारणी आवश्यक आहे.
- त्यासोबतच मर रोग आणि भुरी रोग होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे रोगप्रतिकार फवारणी नियमितपणे करणे आवश्यक आहे.
- खर्च आणि उत्पन्न :
- प्रति एकर खर्च : सुमारे 60,000 तते 70,000 रुपये पर्यंत प्रति एकर खर्च येतो.
- उत्पन्न : आठ ते दहा प्रति एकर उत्पादन मिळते. आणि बाजार भावानुसार 1,50,000 ते 2,00,000 रुपये पर्यंत उत्पन्न जाऊ शकते.
Winter Chilli Cultivation (हिवाळी मिरची लागवड)
हिवाळी मिरची लागवड : हिवाळी मिरची लागवड (Mirchi Lagwad Mahiti) ची माहिती पुढे दिली आहे.
- हंगामाचा कालावधी :
- लागवडीचा काळ : ऑक्टोबर ते नोव्हेंबर.
- काढणीचा काळ : फेब्रुवारी – मार्च
- तापमान : 18°c ते 25°c
- उत्तम जाती :
- पुसा ज्वाला, फुले सई, फुले सूर्यमुखी, जी-2. या जाती हिवाळ्यामद्धे चांगल्या वाढतात आणि रोगप्रतिकारक्षमता चांगले आहे.
- खते (Fertilizers) :
- सेंद्रिय खत : शेणखत दहा ते बारा ट्रक प्रति हेक्टर वापरावे. किंवा कोंपोस्ट खत.
- रासायनिक खते : रोपाच्या लागवडीनंतर 40 किलो नायट्रोजन, 20 किलो फॉस्फरस, आणि 20 किलो पोटॅशियम प्रति हेक्टर द्यावे.
- पानी व्यवस्थापन : हिवाळ्यामद्धे मिरचीला पाण्याची गरज जास्त नसते त्यासाठी नियमित ठिबक सिंचन वापरणे सगळ्यात उत्तम आहे. आणि आठवड्यातून एक वेळ पानी दिले तरी चालते.
- रोग आणि किड नियंत्रण :
- थंडीमुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमी असतो. परंतु मिरचीवर कांदे मावा आणि फुल किडे हल्ला करू शकता.
- पावडरी मिल्ड्यू रोग होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सल्फर युक्त औषधांचा उपयोग करावा.
- खर्च आणि उत्पन्न :
- प्रति एकर खर्च : सुमारे 50,000 तते 60,000 रुपये पर्यंत प्रति एकर खर्च येतो.
- उत्पन्न : सात ते आठ टन प्रती हेक्टर उत्पन्न मिळू शकते. आणि बाजार भावानुसार 1,40,000 ते 1,80,000 रुपये पर्यंत उत्पन्न जाऊ शकते.
Monsoon Chilli Cultivation (पावसाळी मिरची लागवड)
पावसाळी मिरची लागवड : पावसाळी मिरची लागवड (Mirchi Lagwad Mahiti) करायची असेल तर तुम्ही याची माहिती पुढे पाहू शकता. Mirchi Lagwad Mahiti
- हंगामाचा कालावधी :
- लागवडीचा काळ : जून ते जुलै.
- काढणीचा काळ : सप्टेंबेर – ऑक्टोबर
- तापमान : 25°c ते 30°c
- उत्तम जाती :
- मुसळवाडी सिलेक्शन, फुले ज्योती, कोकण क्रांती, जी-3, एनपी-46 या जाती पावसाळ्याच्या आर्द्रतेमध्ये चांगल्या वाढतात आणि उत्पन्न पण चांगले मिळते.
- खते (Fertilizers) :
- पूर्व मशागत खत : शेणखत दहा ते बारा ट्रक प्रति हेक्टर वापरावे.
- रासायनिक खते : पावसाळ्यात मिरचीला 60 किलो नायट्रोजन, फॉस्फरस 30 किलो आणि पोटॅशियम 30 किलो या प्रमाणात खत द्यावे.
- पानी व्यवस्थापन : पावसाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापनाची मुख्य काळजी घेणे गरजेचे आहे कारण पाण्याचा निचरा होणे महत्त्वाचे असते. मिरचीच्या झाडांच्या मुळाजवळ पाणी साचून राहता कामा नये.
- रोग आणि किड नियंत्रण :
- पावसाळ्यात मिरचीच्या फांद्यावर कंदील पिठ्या आणि फुल किडे मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे योग्य कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक असते.
- मर रोग आणि तन नियंत्रणांची मुख्य काळजी घेणे गरजेचे असते.
- खर्च आणि उत्पन्न :
- प्रति एकर खर्च : सुमारे 55,000 तते 65,000 रुपये पर्यंत प्रति एकर खर्च येतो.
- उत्पन्न : 6 ते 7 टन प्रती हेक्टर उत्पन्न मिळू शकते. आणि बाजार भावानुसार 1,30,000 ते 1,70,000 रुपये पर्यंत उत्पन्न जाऊ शकते
Chilli Harvesting (मिरचीची काढणी)

काढणी कधी केली पाहिजे? :
मिरचीच्या फळाच्या पूर्णपणे परिपक्व होण्याच्या आधी काढणी करणे चांगले असते. साधारणता मिरचीच्या लागवडीनंतर (Mirchi Lagwad Mahiti) 80 ते 90 दिवसांनी काढणीला सुरुवात केली तरी चालते. आणि जर मिरच्या पिकवायच्या असतील तर मिरची पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर त्याची काढणी करावी. आणि नंतर ती वाळवावीत.
तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये मिरचीचे योग्य पद्धतीने तंत्रज्ञानाचा उपयोग करून चांगले पीक घेऊ शकता. फक्त त्यासाठी मिरचीची जात, वाण, तुमच्या प्रदेशातील हवामान इत्यादी गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते. मित्रांनो Mirchi Lagwad Mahiti ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आणि अशाच शेतीसंबंधी माहितीसाठी आपल्या माझी शेती या अधिकृत वेबसाईटला भेट देत जा.
मिरची लागवडी (Mirchi Lagwad Mahiti) बद्दल विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न :
मिरची लागवडीसाठी सर्वात चांगली जमीन कोणती आहे?
काळी माती किंवा चिकन माती असणारी शेती मिरची पिकासाठी सगळ्यात उत्तम मानली जाते कारण ही माती पाणी जास्त प्रमाणात धरून ठेवते.
मिरचीची काढणी करण्याची योग्य वेळ कोणती आहे?
मिरची लावल्यानंतर 80 ते 90 दिवसानंतर मिरचीची लागवड करणे योग्य ठरते.
मिरचीची लागवड कोणत्या महिन्यामध्ये केली पाहिजे?
मिरचीची लागवड (Mirchi Lagwad Mahiti) तुम्ही उन्हाळ्यामध्ये जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात करू शकता. तसेच खरीप हंगाम मध्ये जून ते जुलै महिन्यात करू शकता.
मिरचीला किती दिवसाला पाणी दिले पाहिजे?
मिरचीचे पिकाला नियमित पाणी देणे गरजेचे असते. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये मिरची करत असाल तर पाण्याचा निचरा कसा होईल यावरती लक्ष देणे गरजेचे असते.
मिरचीचे पिकावर कोणते कोणते रोग पडतात?
मिरचीचे पिकावर प्रमुख म्हणजे मर रोग, भुरी रोग आहेत. ज्यांच्यासाठी तुम्ही आवश्यक औषधे फवारणे गरजेचे असते.
मिरची साठी महत्वाची रासायनिक खते कोणती आहेत?
मिरची पिकासाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम चे मिश्रण योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते.
ही बातमी पहा :