Maratha Reservation News Today: आंदोलनाच्या विरोधात नाही, परंतु नियमांच पालन व्हायला हव; उच्च न्यायालय चे आदेश

Maratha Reservation News Today in Marathi

Maratha Reservation News Today: सध्या मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली असताना उच्च न्यायालयाने आंदोलनाला परवानगी दिली पण अटींचे उल्लंघन झाल्याबद्दल गंभीर भूमिका घेतली. कोर्टाने आंदोलकांना ठाण्यातच थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तर चला सविस्तर बातमी नेमकी काय आहे पाहूया.

मित्रांनो तुम्हाला शेती व अशाच घडामोडींची माहिती रोज हवी असेल तर आपला माझी शेती व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. त्यासाठी लिंक तुम्हाला पुढे दिली आहे.

Mumbai News Today In Marathi

पूर्ण राज्यातील जनतेला माहीत आहे की मुंबईत मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे. आणि या सुरू असलेल्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण आहे. दक्षिण मुंबईतील रास्ता रोकोमुळे वाहतूक कोंडी झाली, याविरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

यावर आंदोलकांनी परवानगीच्या अटींचे उल्लंघन केल्याच सांगत न्यायालयाने त्यांना ठाण्यातच थांबवण्याचे आदेश दिले. जरांगे-पाटील यांनी पाणीही बंद करत उपोषण तीव्र केले असून, सरकारवर तोडगा काढण्याचा दबाव वाढत आहे. Maratha Reservation News Today

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

आंदोलनाला परवानगी, पण अटींचे उल्लंघन

महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात सांगितले की, आंदोलकांना केवळ सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलनाची परवानगी होती आणि त्यांनी अटी-शर्ती पाळण्याचे हमीपत्र दिले होते. मात्र, आंदोलकांनी परवानगीशिवाय शनिवार-रविवारी रस्त्यावर उतरून नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे आता उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. ते पुढीलप्रमाणे.

उच्च न्यायालयाने या प्रकरणी गंभीर निरीक्षणे नोंदवली. “मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांना उपचार घेण्याचे आदेश देऊ शकतो,” असे कोर्टाने म्हटले. तसेच, आंदोलकांनी अटी-शर्तींचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोर्टाने सरकारला विचारले, “आंदोलकांनी अटींचे उल्लंघन केले, तर नोटीस का दिली नाही?” पावसाळ्यात आंदोलनामुळे शाळा, कॉलेज आणि नोकरदारांना त्रास होत असल्याचेही कोर्टाने नमूद केले.

ही योजना पहा : Krushi Swavalamban Yojana: 4 लाख पर्यन्त अनुदान! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, “या” शेतकऱ्यांना लाभ

आंदोलकांनी काही वकिलांच्या आणि न्यायमूर्तींच्या गाड्या अडवल्याचा आरोपही कोर्टाने गंभीरपणे घेतला. तसेच आता न्यायालयाने सरकारला आंदोलकांना मुंबईबाहेरून येण्यापासून रोखण्याचे आणि ठाण्यातच थांबवण्याचे आदेश दिले. “आंदोलनाच्या विरोधात नाही, पण अटी-शर्तींचे पालन व्हावे. रस्ते अडवून मुंबई थांबवता येणार नाही,” असे कोर्टाने स्पष्ट केले.

आंदोलकांना परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. सरकारने नियमांचे पालन करवावे, असेही कोर्टाने सांगितले आहे. तसेच मनोज जरांगे-पाटील यांचे बेमुदत उपोषण चौथ्या दिवसात आहे. Maratha Reservation News Today

त्यांनी पाणी पिणेही बंद केल्याने त्यांच्या प्रकृतीची चिंता वाढली आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांच्या वकिलांनी ब्रेबॉन आणि वानखेडे स्टेडियम देण्याची मागणी केली, पण कोर्टाने ही मागणी फेटाळली. आहे,. त्यामुळे आता आणखी किती दिवस हे आंदोलन चालणार आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ही माहिती वाचा :