Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana: या योजने अंतर्गत लावा ड्रॅगन फ्रूट सोबत इतर 20 फळ बागा; पहा सविस्तर माहिती

Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana Infromation in Marathi

Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana

Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana: मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला फळबाग लागवड करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण आता शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांची आर्थिक विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात.

आणि यामध्ये एक योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘फळबाग लागवड योजना’ या योजनेमद्धे फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत. त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि शेतीबद्दल अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपला माझी शेती ग्रुप लगेच जॉइन करा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

मनरेगा फळबाग लागवड योजना 2025

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘फळबाग लागवड योजना’ या योजनेंतर्गत वैयक्तिक बांधावर, सलग शेतावर व पडीक जमिनीवर फळझाड व फुलपीक लागवड करता येते. यामध्ये सगल फळबाग लागवडीअंतर्गत वैयक्तिक लाभार्थीला आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, लिंबू, संत्री, सीताफळ, ड्रॅगनफ्रुट, अव्हाकडो, केळी, द्राक्ष आदि फळ पिकांची लागवड करता येते.

तसेच, जर जमीन पडीक असेल तर त्यामध्ये आंबा, बोर, नारळ, सीताफळ इत्यादि फळ झाडांची लागवड करता येते. तसेच गुलाब, मोगरा, निशिगंध आदी फुलझाडांची लागवड करता येते.

हे वाचा : Kanda Lagwad Mahiti in Marathi: कांदा लागवड करण्याची उत्तम पद्धत; नक्कीच होईल फायदा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ‘फळबाग लागवड योजना’ पात्रता

पात्रता : जर तुम्हाला Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • लाभार्थ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
  • जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व सातबाराच्या उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर योजना कोणाच्या संमतीने राबविण्यात येईल.
  • लाभार्थ्याकडे जॉब कार्ड असावे.

योजनेसाठी जॉब कार्ड धारक पुढील अ ते ज प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून लाभ घेण्यास पात्र राहील.

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • निरदीसुचित जमाती
  • दारिद्र्यरेषेखाली इतर कुटुंबे
  • दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी
  • प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखालील लाभार्थी
  • अनुसूचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी अधिनियम 2006 (2007 चा दोन) खालील पात्र व्यक्ती योजनेतील लाभार्थींना लागवड केलेल्या फळझाडे वृक्षांच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायत पिकांचे 90 टक्के आणि कोरडवाहू पिकांचे 75 टक्के झाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील.
  • लाभार्थ्यांना 0.05 हेक्टर ते 2.00 हेक्टर क्षेत्राचे मर्यादित फळझाड लागवड करता येते

हेही वाचा : Bhendi Lagwad Mahiti in Marathi: सुधारित भेंडी लागवड फायद्याची; पहा पूर्ण माहिती

जॉबकार्ड (Job card) काढण्यासाठी पात्रता

जॉबकार्ड (Job card) : जर तुम्हालाही जॉबकार्ड तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

  1. ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.
  2. वय वर्ष १८ पासून पुढे असावा.
  3. अंगमेहनतीचे काम करण्याची तयारी असावी.
  4. सदरची माहिती ग्रामपंचायत मार्फत nrega वेबसाईट भरली जाते व संबंधित मजूर हा nrega साठी पात्र ठरतो. त्याला छोटी पुस्तिका ग्रामपंचायत मार्फत देण्यात येते त्यालाच job card म्हणतात.

फळबाग लागवड योजनेतील पिकांची माहिती

Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana या योजनेमध्ये पुढील पिकांचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये फळपिके, विदेशी पिके, फुलपिके, मसाला पिके असणार आहेत.

  • फळपिके : आंबा, काजू, चिकू, पेरू, संत्रा, डाळिंब, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवट, फणस, कोकम, जांभूळ, अंजीर, द्राक्ष, केळी, सुपारी, साग, गिरीपुष्प, कडुलिंब, सिंधी, शेवगा, हादगा, बांबू, जट्रोफा, कढीपत्ता, पानपिंपरी, करंज व इतर औषधी वनस्पती.
  • विदेशी पिके : ड्रॅगन फ्रुट, अव्हाकॅडो.
  • फुल पिके : गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा.
  • मसाला पिके : लवंग, दालचिनी, जायफळ, मिरी.

इत्यादी पिके Mahatma Gandhi Rashtriya Gramin Rojgar Hami Yojana Falbag Yojana अंतर्गत समाविष्ट आहेत. समाविष्ट जिल्हे – राज्यातील 34 जिल्हे.

मित्रांनो फळबाग लागवड योजना 2025 ची ही माहिती तुमच्या गावातील ग्रुप मध्ये नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पण अशाच अपडेट मिळत राहतील. आणि शेतीबद्दल महत्वाची माहिती पाहण्यासाठी माझी शेती या आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :