Maharashtra Rain Update in Marathi

Maharashtra Rain Update in Marathi: गेले काही दिवसापासून पूर्ण महाराष्ट्र मध्ये पावसाने हाहाकार घातला आहे. आणि पावसाचा मोठा फटका शेती पिकांना देखील बसला आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 20 लाख 12 हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे. तर चला पाहूया कृषीमंत्री याबद्दल काय बोलले ते.
राज्यातील अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला हव्या असतील आपला माझी शेती व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. आणि शेती संबंधी बातम्यांसाठी वेबसाइट ला भेट देत रहा. तर चला पाहूया सविस्तर माहिती.
माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
Dattatray Bharane on Maharashtra Rain
राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात या पावसामुळं जीवन विस्कळीत झालं आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना देखील बसला आहे.
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 20 लाख 12 हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे. त्यांनी वाशिममध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातील 19 जिल्ह्यात 20 लाख 12 हजार 775 एक्कर क्षेत्रावरील पिकांचं मोठे नुकसान
राज्यामध्ये सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण राज्यातील 19 जिल्ह्यात तब्बल 20 लाख 12 हजार 775 एक्कर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग यासह इतर वेगवेगळ्या नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दिली. राज्यात सर्वाधिक 7 लाख 13 हजार 857 एक्कर क्षेत्राचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झाला असून त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यात 4 लाख 11 हजार 392 एकर क्षेत्रावर पिकाचे नुकसान झालंय.
मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वाधिक नुकसान वाशिम जिल्ह्यात असल्याचही भरणे यांनी सांगितले, या झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं भरणे यांनी सांगितलंय. Maharashtra Rain Update in Marathi
ही योजना पहा : Krushi Swavalamban Yojana: 4 लाख पर्यन्त अनुदान! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, “या” शेतकऱ्यांना लाभ
पावसामुळे सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्हे कोणते?
- नांदेड : 285543 हेक्टरवरकील पिकांचे नुकसान
- वाशिम 164557 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
- यवतमाळ 80969 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
- बुलढाणा 74405 हेक्टरवरल पिकांचे नुकसान
- अकोला 43703 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
- सोलापूर 41472 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
- हिंगोली 40000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे पाणीपुरवठा, वीज आणि वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकांना किराणा आणि औषधे मिळवणे कठीण झाले असून प्रशासनाकडून मदतीची मागणी होत आहे. Maharashtra Rain Update in Marathi
शेअर करा Maharashtra Rain Update in Marathi ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांना आणि अशाच अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा. जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील.
ही अपडेट पहा :