Mahaagri AI Information: महाॲग्री धोरणामुळे शेतकऱ्यांना मिळणार नवीन तंत्रसुविधा; डिजिटल शेतीकडे वाटचाल!

Mahaagri AI Information In Marathi

शेकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र सरकारने ‘महाॲग्री-एआय धोरण 2025-2029’ ला मंजुरी दिली आहे, आणि आपण या लेखामध्ये Mahaagri AI Information पाहणार आहोत. या महाअग्रि एआय धोरणामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शेतीत सुधारणा करता येणार आहेत. आणि यासाठी पहिल्या तीन वर्षांत 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन केंद्र स्थापन केले जातील.

तसेच शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सल्लागार प्रणाली आणि मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो जर तुम्हाला शेती संबंधी अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आपला माझी शेती व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. Mahaagri AI Information

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

MAHA Agri AI Policy

काय आहे महाअग्रि एआय धोरण? : तर चला जाणून घेऊया नेमक काय आहे महाअग्रि एआय धोरण.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

तर ‘महाराष्ट्र कृषी- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरण 2025-2029’ या धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दर्शविला असून, या निर्णयामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता, रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तारयोग्य उपाययोजना राबविता येणार आहेत. ‍

आणि या धोरणामुळे राज्यातील अँग्रिस्टेक, महा-ॲग्रिस्टेक, महावेध, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डीबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्रिस्तरीय प्रशासकीय रचना असेल. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी एकूण 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र वेगाने बदलणारे आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील. त्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती, राज्यस्तरीय तांत्रिक समिती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲग्रिटेक नावीन्यता केंद्र, कृषी विद्यापीठांतर्गत कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन व नावीन्यता केंद्र काम करतील. Mahaagri AI Information

ही बातमी वाचा : Agri News Marathi: अहिल्यानगरचा शेतकरी जांभूळ शेतीतून मालामाल; कमावले एवढे रुपये

इनक्युबेशन केंद्र स्थापण्यात येणार

आयआयटी/आयआयएससीसारख्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता नावीन्यता आणि इनक्युबेशन केंद्र स्थापण्यात येतील. त्याशिवाय डेटा-आधारित शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी उपयोगी ठरतील अशा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारल्या जातील. या सुविधा राज्यव्यापी, सुरक्षित, सुसंगत व संमती-आधारित डेटा देवाण-घेवाण सुलभ करतील.

क्लाऊड आधारित कृषी डेटा एक्स्चेंज आणि सँडबॉक्सिंग सुविधा उपलब्ध केली जाईल, या डिजिटल प्लॅटफॉर्मशी केंद्र व राज्य सरकारचे शेती संबंधीत सर्व डेटाबेस जोडण्यात येतील.

ही माहिती वाचा : Bhendi Lagwad Mahiti in Marathi: सुधारित भेंडी लागवड फायद्याची; पहा पूर्ण माहिती

होणार जिओ टॅगिंगचा वापर

अन्नसुरक्षा, पुरवठा साखळीतील पारदर्शकता, अन्न गुणवत्ता हमी आणि शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी कृत्रिम बुद्धिमता, ब्लॉकचेन आणि क्यू-कोड तंत्रज्ञानावर आधारित राज्यव्यापी शोधक्षमता व गुणवत्ता प्रमाणीकरण प्लॅटफॉर्म उभारण्यात येईल. या प्लॅटफॉर्मद्वारे शेतापासून ग्राहकापर्यंतच्या प्रवासात पिकांना दिलेली खते व औषधे, शेती पद्धती, कापणीपश्चात प्रक्रिया व गुणवत्ता प्रमाणपत्र इत्यादी बाबींचे डिजिटल आणि जिओ-टॅग केलेली नोंदवही तयार करेल. Mahaagri AI Information

ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या माझी शेती या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यायला अजिबात विसरू नका. 

ही माहिती वाचा :