Krushi Swavalamban Yojana: 4 लाख पर्यन्त अनुदान! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, “या” शेतकऱ्यांना लाभ

Krushi Swavalamban Yojana Details in Marathi

मित्रांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (Krushi Swavalamban Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी तब्बल चार लाख रुपयापर्यंत अनुदान मिळत आहे. हे अनुदान विविध घटकांसाठी वेगवेगळे आहे त्याची माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि शेतीसंबंधी अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी आपला माझी शेती व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

योजनेचा उद्देश : या योजनेचा उद्देश हा पुढील प्रमाणे आहे.

  • अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे.
  • कृषी क्षेत्रात स्वावलंबन वाढवणे. 
माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना माहिती

योजनेतील मुख्य घटक : या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पुढील घटकांसाठी अनुदान मिळते.

  • नवीन विहीर: नवीन विहीर खोदण्यासाठी 4,00,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळते. 
  • विहीर दुरुस्ती: जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी 1,00,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळते. 
  • शेततळे: शेततळ्यांसाठी प्लास्टिक अस्तरीकरण आणि इतर खर्चाच्या 90% किंवा 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. 
  • सोलर पंप: सोलर पंप साठी पन्नास हजार रुपये अनुदान आहे.
  • ठिबक सिंचन : ठिबक सिंचन साठी या योजना अंतर्गत 97 हजार रुपयांच्या अनुदान मिळते.
  • तुषार सिंचन : तुषार सिंचन साठी 47 हजार रुपये अनुदान आहे.
  • इनवेल बोरिंग : यासाठी चाळीस हजार रुपये अनुदान आहे.
  • पंप संच : पंप संचसाठी 40 हजार रुपये अनुदान आहे.
  • वीज जोडणी : यासाठी वीस हजार रुपये अनुदान आहे

Krushi Swavalamban Yojana Eligibility

आवश्यक पात्रता : जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • एससी/ नव बौद्ध प्रवर्गातील लाभार्थी.
  • सातबारा आणि आठ अ उतारा नावावर असणे आवश्यक.
  • बँक खाते आधाराची लिंक असणे आवश्यक.
  • दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य.
  • 0.40 ते 6 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक.
  • एकदा लाभ घेतल्यास पाच वर्ष लाभ मिळणार नाही.

Krushi Swavalamban Yojana Documents

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड.
  • बँक पासबुक (आधार कार्ड लिंक असलेले.)
  • शेतकरी ओळख प्रमाणपत्र.
  • शेतकऱ्याचा फोटो.
  • शेत जमिनीचा नकाशा. (आवश्यक असेल तर)
  • संयुक्त करार पत्र (जमीन कमी असल्यास)
  • स्वयंघोषणापत्र (इतर योजनांचा लाभ नसेल तर)

Dr. Babasaheb Krushi Swavalamban Yojana Apply Online

अर्ज करण्याची प्रक्रिया: तुम्ही अर्ज हा पुढील पद्धतीने करू शकतात.

  • शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT portal) ऑनलाइन अर्ज करावा, असे शासनाने कळवले आहे.
  • महाडीबीटी पोर्टल लवकरच पुन्हा सुरू होईल आणि शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी अर्ज करण्याची संधी मिळेल, असे शासनाने सांगितले आहे.
  • 2025-26 पासून, “प्रथम अर्ज, प्रथम लाभ” या तत्वावर अर्ज मंजूर केले जातील, असेही शासनाने सांगितले आहे. 
अधिकृत शासन निर्णययेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
शेअर करा ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत आणि अशाच माहितीसाठी आपल्या माझी शेती वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

ही अपडेट पहा :