Karj Mafi Maharashtra News Marathi
Karj Mafi Maharashtra: राज्यामध्ये विविध ठिकाणी शेतकरी कर्ज माफी साठी मोर्चे काढत आहेत आणि सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा अशी माघाणी करत आहेत. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध न्याय्य हक्कांसाठी राजुरा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. शेतकऱ्यांचा सातबारा (कर्ज) पूर्णपणे कोरा करण्यात यावा, या मुख्य मागणीसह सरकारविरोधी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा भवानी माता मंदिरापासून सुरू होऊन तहसील कार्यालयावर धडकला. या वेळी तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जवळपास २७ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. पुढे पहा नेमक या मोर्च्या मध्ये कोणत्या माघण्या करण्यात आल्या आहेत. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला माझी शेती व्हाटसप्प चॅनल जॉइन करा.
| माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
कर्ज माफी महाराष्ट्र बातम्या

प्रमुख मागण्या:
- शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा.
- ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ त्वरित मागे घेण्यात यावे.
- खतांचा कृत्रिम तुटवडा दूर करावा आणि कापूस तसेच सोयाबीन उत्पादकांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
- कृषीपंपांना नियमित वीजपुरवठा करण्यात यावा.
- अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे तातडीने देण्यात यावेत.
- स्थानिक उद्योगांमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
- संजय गांधी निराधार आणि वृद्धापकाळ पेन्शनमध्ये वाढ करावी.
- बोगस मतदार नोंदणीप्रकरणी योग्य कारवाई व्हावी. Karj Mafi Maharashtra News
ही बातमी वाचा : Nuksan Bharpai 2025: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आजपासून खात्यात जमा होणार अतिवृष्टीची नुकसान भरपाई
नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांनी जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप केला. मतांची चोरी करून सत्तेत आलेले हे सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी केवळ लूट आणि दिशाभूल करत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
माजी आमदार सुभाष धोटे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. तसेच, राजुरा तालुक्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध वाळू चोरीला राजकीय पाठबळ मिळत असल्याचा आरोप करत, वाळू चोरांवर कारवाई न झाल्यास पुढील मोर्चा थेट तहसील कार्यालयावर काढण्यात येईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
या जनआक्रोश मोर्चात खासदार प्रतिभा धानोरकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेअर करा ही माहिती इतर शेतकरी मित्रांना आणि भेट देत जा आपल्या माझी शेती या पोर्टल ला. Karj Mafi Maharashtra News
ही बातमी वाचा :
