Karj Mafi 2025 Maharashtra

राज्यातील हजारो शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांनी व शेतकरी नेत्यांनी याबाबत वारंवार मागणी केली आहे. अशातच आता शेतकरी कर्जमाफीबाबत (Karj Mafi 2025) मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मोठ विधान केल आहे. त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे. तर चला पाहूया नेमकं मंत्री संजय राठोड यांनी काय विधान केले आहे.
मित्रांनो जर तुम्हाला शेतीसंबंधी अशाच नवनवीन अपडेट आणि शेती बद्दलची माहिती रोज हवी असेल तर आपल्या माझी शेती व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा. त्यावर तुम्हाला डेली अपडेट मिळत जाईल.
माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
कर्जमाफी 2025 महाराष्ट्र
संजय राठोड यांचे मोठे विधान : मंत्री संजय राठोड यांनी कृषी गौरव पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, हा पुरस्कार नसून नव्या पिढीला दिलेला ठेवा आहे. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील.
महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख आहे. राज्याच्या प्रमुखांकडून लवकरच याची घोषणा केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. Karj Mafi 2025
शेतकऱ्यांचा यवतमाळमध्ये सन्मान
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे एका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठं विधान केलं आहे. आता फक्त कर्जमाफी कधी होते याच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
त्याच्या अगोदर पण कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकरी कर्जमाफीबाबत (Karj Mafi 2025) भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की मी शेतकरी पुत्र आहे. माझा जन्म शेतकऱ्याच्या घरात झाला आहे. सकाळी उठलो तरी मला शेती दिसते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहिती आहेत. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील असं भरणे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता आगामी काळात कर्जमाफीचे संकेत मिळाले आहेत.
Karj Mafi झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी पीककर्ज काढून पिकांची लागवड केली होती, मात्र दुष्काळामुळे अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत, त्यामुळेच वारंवार कर्जमाफीची मागणी करण्यात येत आहे. आणि आता आणखी देखील या सततच्या पावसामुळे असणाऱ्या पिकांचे सध्या शेतामध्ये असणाऱ्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
कर्जमाफी बद्दल येणाऱ्या अशा तुम्हाला मिळत राहतील त्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट देत जा आणि शेअर करा Karj Mafi 2025 ची ही माहिती तुमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये आणि गावातील मित्रांसोबत.
ही माहिती वाचा :