Karj Mafi 2025 Maharashtra: सातबारा कोरा करण्याची घोषणा फसवी, ठिकठिकाणी आंदोलने!

Table of Contents

Karj Mafi 2025 Maharashtra News

Karj Mafi 2025 Maharashtra: अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महायुती सरकारला जाग आणण्यासाठी रविवारी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नागपूर-चंद्रपूर महामार्ग चक्काजाम आंदोलन केले. यावेळी महामार्गावरील वाहतूक २ तास ठप्प झाली होती. 

कारण सरकारने सुरुवातील शेतकऱ्यांचा सतबारा कोर करू असे आवाहन केले होते. पण सरकारने नुकसान भरपाई ला पुढे करत कर्ज माफी ला कानामंगहे टाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. तर नेमकी बातमी काय आहे. पुढे वाचा सविस्तर. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला माझी शेती व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

Farmer Protest in Maharashtra

Karj Mafi 2025 Maharashtra News
Karj Mafi 2025 Maharashtra News

‘ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी द्या’ या प्रमुख मागणीसाठी वरोरा येथील रत्नमाला चौकात हजारो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली ‘सातबारा कोरा’ करण्याची घोषणा खोटी ठरल्याचा संतप्त आरोप करत, खासदार धानोरकर यांनी केला. 

ही बातमी वाचा : Flood Damage Relief: पशुधनासाठी राज्य सरकारची मदत जाहीर; प्रति दुधाळ जनावरासाठी मिळणार 37,500 रुपये!

या वेळी खासदार धानोरकर यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत, निवडणुकीपूर्वी भाजपने जाहीरनाम्यात केलेली ‘सातबारा कोरा’ करण्याची घोषणा निव्वळ फसवी ठरल्याचे ठणकावले. महाराष्ट्रातील बळीराजा संकटात आला असून कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, पण तरीही महायुती सरकार मात्र फक्त मोठमोठ्या वल्गना करून रिकाम्या आश्वासनांची फसवी नाटकं करत आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

ही बातमी वाचा : Maharashtra Farmer Flood Package: अतिवृष्टीच्या ‘पॅकेज’चा फुसका बार; सरकारची पुन्हा एकदा शब्दांची चलाखी

काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच शेतकरी यांनी खाली बसून रस्ता अडवून धरल्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. मात्र रुग्णवाहिकेना मार्ग मोकळा करून दिला जात होता. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बाकल, तहसीलदार योगेश कोटकर, ठाणेदार तांबडे यांनी खासदार धानोरकर यांना आश्वासन देऊन आंदोलन संपवण्याची विनंती केली. Karj Mafi 2025 Maharashtra

मात्र प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे याकरिता त्यानंतर त्यांनी तहसीलदार योगेश कोटकर यांना निवेदन दिले. या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे, चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी, प्रवीण काकडे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेलभाई रजा शेख, प्रशांत भारती, मिलिंद भोयर, प्रशांत काळे, विलास टिपले, सूरज गावंडे, राजू चिकटे, गोपाल अमृतकर

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विशाल बदखल,  ऐश्वर्या खामनकर, संध्या पोडे, दिपाली माटे, सरीता सूर, छोटू शेख, राजू महाजन, अनिल झोटिंग, गणेश चवले, दिलीप टिपले, लक्ष्मण बोधाले, दिनकर ठेंगणे, वसंत विधाते, गिरीधर कष्टी यांसह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. Karj Mafi 2025 Maharashtra

ही बातमी वाचा :