Kanda Lagwad News
आता पूर्ण राज्यभर पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच इतर राज्यातही पाऊस मोठ्या प्रमाणावर आहे. आणि या सततच्या पावसासह दर अनिश्चित असल्याने यंदा लागवड कमी होईल, असे सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे. तसेच खानदेशात लेट खरीप कांदा लागवडीस वेग आला असून, मजूरटंचाईमुळे लागवड रखडत सुरू आहे.
तसेच परतीच्या पावसाची शक्यता व इतर समस्यांमुळे यंदा लागवड कमी होणार असल्याचे चित्र आहे. तर चला सविस्तर माहिती पुढे पाहूया पान त्यागोदर शेती बद्दल अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या माझी शेती या व्हाटसप्प ग्रुप ला लगेच जॉइन व्हा!
माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
कांदा लागवड बातम्या
Kanda Lagwad : कांदा लागवडीची कार्यवाही जळगावमधील जळगाव, यावल, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर यासह धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारातील नंदुरबार, शहादा भागात सुरू आहे. सततच्या पावसामुळे कांद्याचे भाव सध्या अनिश्चित आहेत. आणि त्यामुळेच यंदा लागवड कमी होईल, असे सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे.
मागील हंगामात उन्हाळ कांद्याची खानदेशात सुमारे 38 हजार हेक्टरवर लागवड झाली होती. आता खरिपातील किंवा उशिराची लागवड सुमारे 18 हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा, जळगावातील चोपडा, यावल, जळगाव, धरणगाव या भागात लागवड कमी होईल, असा अंदाज आहे.
ही माहिती वाचा : Karj Mafi 2025 Maharashtra: मोठी बातमी! शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, मुख्यमंत्री घोषणा करणार!
खानदेशात मागील काही दिवस पाऊस नाहीये त्यामुळे कांदा लागवड सुरू आहे, सर्वत्र लागवडीला वेग आला आहे. परंतु अनेक भागांत मजूरटंचाई असून, लागवडीसंबंधी कार्यवाही रखडत सुरू आहे.
लागवडीसाठी अनेक शेतकरी बाहेर गावांतून वाहतूक भाडे खर्च करून मजूर आणत आहेत. काही गावांत कांदा लागवड करणारे कुशल मजूरदेखील आहेत. या मजुरांच्या गटांकडून अनेक शेतकरी लागवड करून घेत आहेत.
ही अपडेट पहा :