Kanda Bajar Bhav Today
Kanda Bajar Bhav: मित्रांनो सध्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हाल चालले आहेत. आणि एकीकडे कांद्याला घोडेगाव मधील उपबाजार मध्ये केवळ 800 रुपये ते 1,100 रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहे. आणि हा भाव आता किती दिवस असाच राहणार, की वाढणार याची वाट बघत आहेत.
घोडेगाव कांदा बाजार भाव : आता सध्या राज्यभरात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहेत. आणि एकीकडे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घटला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. या होणाऱ्या अवकाळी पावसाने गहू, बाजारी, केळी, कांदा पिकांची मोठी नुकसान झाली आहे. आणि या अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कांड भिजला आहे. आणि कित्येक शेतकाऱ्यांकडे कांदा साठवणुकी साठी सुविधा उपलब्ध नाहीयेत.
त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता कांदा विकल्याशिवाय दूसरा पर्याय नाही. आणि शनिवारी दिनांक 5 रोजी घोडेगाव (उपबाजार) मध्ये कांद्याला सरासरी 800 ते 1100 रुपये प्रतीक्विंटल भाव मिळाला आहे. तर क्वचित एखाद्या वक्कल ला 1300 ते 1400 रुपये भाव मिळाला आहे.
जर शेतकऱ्याला एवढा भाव मिळत असेल तर त्या कांदा पिकासाठी झालेला खर्च देखील निघत नाहीये. आणि यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. आणि अशी वेळ यामुळे येत आहे की गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना माहिती आहे की वर्षामध्ये काही दिवस कांद्याला चांगला भाव मिळत असतो.
त्यामुळे शेतकरी कांदा मोठ्या प्रमाणावर पिकवत आहे आणि त्याची कांदा चाळ मध्ये साठवणूक करत आहे. आणि आता मार्केट मध्ये कांच्याची आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे. तर यावर काही जणांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. ते तुम्ही पाहू शकता. Kanda Bajar Bhav

"सध्या कांच्याची निर्यात जरी चालू असली तर बाहेरील देशामध्ये भारतीय कांद्याला मागणी कमी आहे. आणि सध्या महाराष्ट्रामधून कांदा पुरवठा होत असल्यामुळे इतर राज्यातील शेकऱ्यांना कांदा विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळ महाराष्ट्रातील कांद्याला इतर राज्यातून देखील मागणी कमी आहे. आणि यामुळेच कांद्याच्या भावामद्धे एवढी घसरण पाहायला मिळत आहे. - सुदाम तागड, कांदा आडतदार, घोडेगाव."
"नेवास बाजार समितीचा घोडेगाव कांदा उपबाजार हा 2003 मध्ये सुरू झालेला आहे. त्यानंतर कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत राहिली. आणि 5 ते 6 वर्षानी या घोडेगाव उप बाजारामद्धे दिवसाला 10 टणाच्या 400 ते 500 गाड्या आवक यायला लागली. आणि यामुळे घोडेगाव उप बाजार महाराष्ट्रातील प्रमुख कांदा मार्केट म्हणून ओळखले जात होते. आणि शनिवारी दि. 5 रोजी प्रथमच सगळ्यात कमी आवक झाल्याची नोंद झाली आहे. - अशोक नाना येळवंडे, अध्यक्ष कांदा व्यापारी असोसिएशन"
मित्रांनो त्यामुळे कांद्याला येणाऱ्या किती दिवसामध्ये भाव (Kanda Bajar Bhav) येईल अशी तरी आणखी काही अपडेट नाहीये. त्यामुळे आता शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देत आहेत. ही माहिती शेअर करा इतर शेतकरी मित्रांना. आणि शेती विषय अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या माझी शेती वेबसाइट ला भेट देत जा.
धन्यवाद!

Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
yes