Farmer Support: अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक नष्ट झालेल्या धानोरा काळे येथील शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

Table of Contents

Farmer Support Dhanora

Farmer Support: आता राज्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यां नुकसान भरपाई वाटप सुरुवात झालीच आहे. पण अशातच परभणी जिल्ह्यात, पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर मदतीचा हात मिळाला आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे वनारसबाई शंकरराव काळे या शेतकरी महिलेचे ५० गुंठे क्षेत्रावरील संपूर्ण सोयाबीन पीक नष्ट झाले.

तर पुढे पहा या शेतकऱ्याने किती मदत मिळाली आहे आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी आपल्या माझी शेती व्हाट्सअप चॅनलला लगेच जॉईन व्हा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

शेतकरी अतिवृष्टी मदत

या आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी भाजीपाला उत्पादक शेतकरी गटाने पुढाकार घेतला. प्रगतिशील शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आणि दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीतून जमा झालेले रोख ४० हजार रुपये काळे कुटुंबाला देण्यात आले. Farmer Support

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

शुक्रवारी (ता. १७) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश भूषण काळे आणि प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत देशमुख-वरपुडकर यांच्या हस्ते ही मदत बाधित शेतकरी दांपत्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील डॉ. गजानन गडदे, डॉ. डी. डी. पटाईत यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

ही बातमी पहा :