Farmer Loan Wavier: शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे सरकारचा डाव? कर्जमाफी वरुण अजित नवलेंचा सरकारवर डाव

Table of Contents

Farmer Loan Wavier News Today

Farmer Loan Wavier: मित्रांनो सध्या कृषि विभागाने नुकतेच शेतकरी ओळख क्रमांक बनवणे बंधनकारक केले आहे. नाहीतर शेतकरी ओळख क्रमांक न बनवलेल्या शेतकऱ्याला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे. आणि राज्यामध्ये जवळ जवळ 1 करोंड लोकांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यात आले आहेत. आणि आणखी 71 लाख शेतकरी यापासून वंचित आहेत. आणि कृषि विभागाने 15 एप्रिल पासून हा क्रमांक अनिवार्य केल्यामुळे शेतकरण्यांमद्धे गोंधळ उडाला आहे.

आणि कृषी विभागाने हा क्रमांक बंधनकारक केल्यामुळे यावरून माकपचे राज्यसचिव डॉक्टर अजित नवले यांनी संशय व्यक्त केला आहे. ऍग्री स्टॅक योजनेच्या नावाखाली कॉर्पोरेटला शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध करून देण्याचा कट असल्याचा संशय नवले यांनी व्यक्त केला आहे. तसेच नवले यांनी राज्य सरकारच्या धोरण लकव्यावर देखील टीका केली आहे. Farmer Loan Wavier

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

Agristck Scheme

Farmer Loan Wavier

राज्यामध्ये महायुतीचे सरकार येऊन बरेच दिवस लोटले आहेत आणि अद्यापही कर्ज माफी बाबत कुठेही चर्चा नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी कर्जमाफी वरून नाराज आहे. नवले म्हणाले की ” एक रुपयात पिक विमा योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातला कर्जमाफीचा पत्ता नाही. बळीराजाच्या विविध योजनांना कात्री लागत आहे. तरी देखील योजनेचा लाभ देण्यासाठी फार्मर आयडी आणि द्वारे करण्यात आला आहे. यामधून शेतकऱ्यांचा डेटा कॉर्पोरेटला उपलब्ध करून देण्याचा डाव आहे” असे नवले यांनी आरोप केले आहेत.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

आता राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू आहेत. आणि या सर्व योजनांचा लाभ शेतकरी डिजिटल पद्धतीने एकाच जागेवरून घेऊ शकतो त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच Agristck Sheme सरकारने सुरू केले आहे. असा दावा केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.

आणि याच पार्श्वभूमीवर नवले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे कित्येक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे परंतु राज्य सरकार विविध योजनांचा लाभ देण्यासाठी देण्यात येणाऱ्या ओळखपत्र क्रमांक.

आणि या ओळख क्रमांकाच्या नावाखाली शेती, शेतीतील पीक, आणि शेतकऱ्यांच्या पिकांच्या आकडेवारी कॉर्पोरेट कंपन्यांना उपलब्ध करून देण्याचा घाट घातल्याचा आरोप देखील नवले यांनी केला आहे. तसेच ही पारतंत्र्याची नांदी असल्याचे मत नवले यांनी व्यक्त केलं.

ही महत्वाची माहिती वाचा :

Mirchi Lagwad Mahiti: अशा पद्धतीने मिरची लागवड केली तर होईल फायदा! पहा पूर्ण माहिती

नवले यांनी केलेल्या या दाव्यावर तुमचे काय मत आहे नक्की कळवा आणि शेती बद्दल अशाच नवनवीन अपडेट रोज जाणून घेण्यासाठी. आपल्या माझी शेती या वेबसाईटला अवश्य भेट देत जा. Farmer Loan Wavier

ही महत्वाची अपडेट पहा :