Farmer Demand Maharashtra: शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये मदत करा; संभाजी ब्रिगेड

Table of Contents

Farmer Demand Maharashtra

Farmer Demand Maharashtra: गेल्या दीड महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू आहे. आणि त्यामुळे राज्यामधील विविध जिल्ह्यामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे. कित्येक जणांचे संसार उद्वस्त झाले आहेत. आणि त्याची दखल घेत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्यानुसार मदत मिळावी, अशी मागणी अंजनगावसूर्जी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच राज्यातील विविध राजकीय उमेदवार आणि जनता देखील विविध माघण्या सरकारकडे करत आहेत. पुढे ही बातमी सविस्तर दिली आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला माझी शेती व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

आजच्या शेती बातम्या

Farmer Demand Maharashtra

या संदर्भाने आमदार गजानन लवटे तसेच अंजनगावसूर्जी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्याच्या परिणामी पारंपरिक त्यासोबतच व्यावसायिक पिकांचेही नुकसान झाले. फळबागायतदारांना याचा सर्वाधिक फटका बसला.

अनेक भागात जमीन खरडून गेल्याने शिवारातील उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांची कधीही भरून न निघणारे नुकसान यामुळे झाले आहे. पुराचे पाणी घरात शिरल्याने अन्नधान्यासह कुटुंबातील मुलांच्या शैक्षणिक साहित्याला ही झळ बसली. या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍य निर्माण झाले आहे. Farmer Demand Maharashtra

अनेक शेतकरी जगण्याची उमेद हरवून बसले आहेत. गुरेढोरे देखील वाहून गेल्याने शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांनाही नुकसान सोसावे लागले आहे. शेतकरी चारही बाजूने संकटात सापडला आहे. त्याच्या परिणामी नजीकच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये देखील वाढ होण्याची भीती आहे.  

या वेळी निवेदन देताना तालुकाध्यक्ष शरद कडू, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्रेमकुमार बोके, शहराध्यक्ष राजेश शिंगणे, मराठा सेवा संघाचे बाळासाहेब गोंडचवर, ज्ञानेश्‍वर तुरखडे, रमेश सावळे, रामेश्‍वर पाखरे, सिद्धार्थ सावळे, वृषभ ठाकरे, राहुल उके, डॉ. प्रकाश भदे, नीलेश ढगे, रोहित कान्हेरकर, अंकेश खाडे, गजानन टेकाडे, बाळासाहेब हिंगणीकर यांची उपस्थिती होती.

तर आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत देखील जाहीर केलेली आहे. पण शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये मदत करा अशी माघणी संभाजी ब्रिगेड ने देखील केली आहे. Farmer Demand Maharashtra

ही बातमी वाचा :