Bhendi Lagwad Mahiti in Marathi

तुम्ही पण विचार करताय का भेंडी लागवड करण्याचा? तर आपण Bhendi Lagwad Mahiti in Marathi या लेखाद्वारे सुधारित भेंडी लागवड ची पूर्ण माहिती पाहणार आहोत, जेणेकरून जर तुम्ही पुढील पद्धतीने भेंडी लागवड केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण शेतीमध्ये कोणत्याही पिकाचे उत्पादन घेत असताना त्याचे परिपूर्ण नियोजन असणे अत्यंत आवश्यक असते.
तर पुढे आपण भेंडी लागवडीची पूर्ण माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच भेंडी लागवडीचा विचार करा. तसेच तुम्हाला माझी शेती वर अशीच आवश्यक माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या माझी शेती ग्रुप ला नक्की जॉइन व्हा.
माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
भेंडी लागवड पूर्ण माहिती
भेंडीचे या पिकाचे मूळ स्थान हे दक्षिण आफ्रिका किंवा आशिया असे मानले जाते. आणि भेंडी असे पीक आहे ज्याला बाजारामध्ये वर्षभर मागणी असते आणि भेंडी हे एक नगदी पीक आहे. भेंडी पीक वर्षभर घेतले जाते त्यामुळे शेतकऱ्याला वर्षभर फायदा मिळतो .भेंडी ही मोठ्या प्रमाणामध्ये हवाबंद डब्यांमधून निर्यात केली जाते. त्यामुळे याला माघणी असते.
खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये भेंडीचे उत्पन्न खूप चांगले भेटते. त्यामुळे जास्त लोक उन्हाळ्यात भेंडीची शेती करतात. भेंडीमध्ये अ ,ब आणि क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. तसेच चुना ,पोटॅशियम ,लोह, मॅग्नेशियम ,खनिजे मुबलक प्रमाणामध्ये असतात .भेंडीला हवाबंद डब्यामध्ये मिठाच्या द्रावणामध्ये साठवून प्रक्रिया करून ठेवले जाते. तसेच डीहायड्रेट भेंडी सुद्धा भाजीसाठी वापरले जाते.
भेंडीच्या प्रमुख जाती
तर चला आता पाहूया भेंडीच्या एकूण किती जाती आहेत. पुढे तुम्ही पाहू शकता की कोणत्या जाती आहेत आणि किती उत्पादन मिळते ते.
पुसा सावणी :
भेंडीची ही जात आय .ए .आर .आय ने विकसित केलेकी आहे. या जातीच्या फळांची लांबी 10 ते 15 सेंटीमीटर असते. या जातीच्या फळाच्या देठावर तांबूस छटा दिसतात आणि भेंडी मुलायम असते. या जातीच्या फुलाचा रंग पिवळा असून प्रत्येक पाकळीवर एक पिवळा ठिपका असतो .सुरुवातिच्या काळामध्ये ही जात येल्लो मोजेक व्हायरसला प्रतिकारक आहे .या जातीचे हेक्टरी उत्पादन 8 ते 10 टन पर्यंत मिळते.
परभणी क्रांती :
भेंडीची ही जात वसंतराव नाईक मराठवाडा मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. या जातीच्या फळांची लांबी सात ते दहा सेंटिमीटर पर्यंत असते आणि ही जात वायरस रोगाला प्रतिकारक आहे .लागवड केल्यानंतर 55 दिवसांमध्ये पहिला तोडा सुरू होतो .या जातीचे हेक्टरी उत्पादन सात ते आठ टन पर्यंत मिळते. Bhendi Lagwad Mahiti in Marathi
अर्का अनामिका :
या जातीची फळे लांब कोवळी ,हिरवी असतात. फळांचा देठ लांब असून ही जात येल्लो व्हेन मोजे या वायरसला प्रतिकारक आहे .लांब देठ असल्यामुळे काढणी करताना फळे तोडायला सोईस्कर असते या जातीचे हेक्टरी उत्पादन 9 ते 12 टन पर्यंत मिळते.
महिको 10 :
भेंडीची ही जात महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय असून ह्या भेंडीच्या रंग गर्द हिरवा असून हेक्टरी दहा ते बारा टन पर्यंत उत्पादन मिळते.5. वर्षा : भेंडीची ही जात देखील महाराष्ट्र मधील अधिक लोकप्रिय जात आहे .या जातीच्या फळांची लांबी साधारणपणे 5 ते 7 सेंटीमीटर पर्यंत असते आणि फळे हिरवी व लुसलुशीत असतात .या जातीचे सरासरी उत्पादन 10 ते 12 टन हेक्टरी भेटते. Bhendi Lagwad Mahiti in Marathi
Bhendi Sheti Sathi Jamin (लागणारी जमीन)
- भेंडीची लागवड मध्यम ते काळ्या भारी जमिनीमध्ये करता येते.
- भेंडीसाठी जमीन ही उत्तम सेंद्रिय पदार्थ असलेली आणि उत्तम निचरा होणारे असावी.
- पाणी साठवून राहील अशी जमीन भेंडीसाठी चांगली ठरत नाही पाणी साठत असल्यामुळे भेंडीच्या मुळांची कुज होते.
- लागवडीसाठी जमिनीचा सामू 6 ते 7 यादरम्यान असल्यास भेंडीचे उत्पन्न चांगले येते.
- अमलयुक्त किंवा अल्कली युक्त जमिनीमध्ये भेंडीची लागवड करू नये उत्पन्न कमी मिळते. Bhendi Lagwad Mahiti in Marathi
भेंडीसाठी उपयुक्त तापमान
भेंडीची शेती करण्यासाठी एक महत्वाचा भाग म्हणजे उपयुक्त हवामान. पुढे तुम्ही आवश्यक तापमानाची माहिती पाहू शकता.
- भेंडी ही उष्ण तापमान मध्ये चांगले येते. कमी तापमानामध्ये भेंडीची उगवण चांगली होत नाही.
- 20° ते 40° सेल्सियस तापमानामध्ये भेंडी चांगली उगवते. त्यामुळे
- वातावरणामध्ये तापमानाचे प्रमाण जास्त वाढल्यानंतर म्हणजेच 42 अंश सेल्सिअसच्या वरती गेल्यानंतर भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची गळ होते आणि अति दमट वातावरणामध्ये भेंडीवर भुरी या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो.
- कडाक्याची थंडी आणि जास्त तापमान दोन्हीही भेंडीच्या झाडावर अनिष्ट परिणाम दाखवतात.
- कोकण या विभागामध्ये रब्बी हंगामामध्ये भेंडी लावली जाते.
भेंडीसाठी हंगाम
प्रत्येक पिकासाठी आवश्यक हंगाम आवश्यक असतो. तसेच भेंडीसाठी आवश्यक हंगाम कोणता? याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता. Bhendi Lagwad Mahiti in Marathi
- भेंडीची लागवड तीनी हंगामामध्ये करू शकतो.
- पण खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये लागवड केल्यानंतर उत्पादन जास्त मिळते.
- खरीप म्हणजे जून – जुलै आणि उन्हाळी मध्ये जानेवारी -फेब्रुवारी मध्ये लागवड केली जाते.
- भेंडीची लागवड करण्यासाठी निवडलेल्या जमिनीवर खोल नांगरट करावी आणि उभ्या आडव्या कोळप्याच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
- भेंडीची लागवड दोन पद्धतीने केले जाते सपाट वाफेवर किंवा सरी वरंबावर.
- भेंडीची लागवड ही 30×20 सेंटीमीटर किंवा 30×15 सेंटीमीटर ह्या अंतरावर केली जाते.
- भेंडीच्या लागवडीसाठी हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणे लागतात.
खत व पानी व्यवस्थापन
- जमीन तयार करत असताना 20 ते 30 गाड्या शेणखत प्रति एकर घालावे किंवा जमिनीमध्ये घन जीवामृत मिसळून घ्यावे.
- भेंडीला पंधरा दिवसाच्या अंतराने जीवामृत सोडावे.
- लागवड केल्यानंतर रोप लागू होऊपर्यत पाण्याचे नियोजन व्यवस्थित करावे लागते.
- त्यानंतर उन्हाळ्यामध्ये पाच ते सहा दिवसांनी आणि हिवाळ्यामध्ये दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पाणी सोडावे.
- ठिबक सिंचन भेंडीच्या लागवडीसाठी योग्य ठरते .
- त्यामुळे पाण्याची बचत होते आणि जीवामृत सोडण्यासाठी सुद्धा ठिबक योग्य ठरते.
भेंडीची घ्यायची महत्वाची काळजी
तुम्ही पुढील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. Bhendi Lagwad Mahiti in Marathi
- गरजेनुसार रोपांची विरळणी करावी आणि शेतात उगलेले तन खुरपणी करून काढून घ्यावे.
- फुले येण्याच्या काळामध्ये पिकांना मातीची भर द्यावी.
- खरीप हंगामामध्ये पाणी साठू नये म्हणून शेतामध्ये चर खांदून घ्याव्यात जेणेकरून शेतामद्धे पानी साठून राहणार नाही.
भेंडीवरील कीड व रोग
भेंडीवर अनेक प्रकारचे रोग आणि कीड पडते. त्याची काळजी वेळेवर घेणे गरजेचे असते. अन्यथा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होते. त्यासाठी सर्व रोग आणि कीड ची माहिती पुढे दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.
तर चला अगोदर आपण कीड पाहूया : Bhendi Lagwad Mahiti in Marathi
तुडतुडे :

भेंडीवरील ही कीड भेंडीच्या पानाच्या खालचा भाग कुरतडून खातात .त्यामुळे पाने पिवळी दिसू लागतात आणि याचा परिणाम झाडाच्या वाढीवर होतो. यामुळे झाड कमकुवत होते. त्यामुळे यावर वेळेवरच नियंत्रण करणे गरजेचे असते. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी. ज्याने यावर ताबा मिळवला जाऊ शकतो.
फळे पोखरणारी अळी :

फळे पोखरणारी अळी हा मुख्य रोग आहे. कारण ही अळी भेंडी या पिकाची मुख्य कीड असून भेंडीच्या पिकाचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान करते. ही किड शेंड्याकडून खोडात शिरते आणि आतील पूर्ण भाग पोखरून खाते आणि देठाजवळ जाऊन देठातून फळात शिरून फळाचे देखील नुकसान करते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे फळे वाकडेतिकडे होतात आणि फळावर छिद्र दिसतात. त्यामुळे फळांची प्रत कमी होते.
या किडीचा नियंत्रण करण्यासाठी प्रादुर्भाव झालेली फळ नष्ट करावी आणि जैविक कीटकनाशकांचा वापर शेतात करावा.अन्यथा तुमचे पीक तर येईल पण किडके. त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. Bhendi Lagwad Mahiti in Marathi
घाटे अळी :

ज्या प्रकारे फळे पोखरणारी अळी पिकाच मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकते अशाच प्रकारे ही अळी देखील पिकाचे नुकसान करते. ही आळी हिरव्या रंगाची असते. ही अळी कोवळी फळे ,कळ्या यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव करते. कीड लागलेली फुले आणि फळे गळून पडतात ,त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते.
या किडीवर नियंत्रण करण्यासाठी एकरी 4 ते 5 फेरोमेन सापळे लावावेत आणि कीडग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावी . प्रादुर्भाव जास्त वाढल्यास जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. Bhendi Lagwad Mahiti in Marathi
पांढरी माशी :

या किडीचे प्रौढ आणि पिले दोन्ही झाडांना नुकसान पोहोचवतात. कारण पिल्ले आणि प्रौढ दोन्ही अवस्था झाडातील रस मोठ्या प्रमाणामध्ये शोषून घेतात .त्यामुळे झाडांची वाढ खुंटते आणि पाणी अर्धवट पिवळे होतात. परिणामी झाडाला भेंडी लागत नाही. त्यामुळे झाडे मोठे तर दिसतात पण हवे तसे फळ त्यावळ लागत नाही.
त्यासाठी यावर वेळेवरच ताबा मिळवणे गरजेचे असते. या माशी मुळे भेंडी मधील येल्लो व्हेन मोजेक वायरस पसरतो. या किडीचे योग्य नियोजन करण्यासाठी शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा. एकरी अठरा ते वीस चिकट सापळे लावावेत आणि पंधरा दिवसातून दोन वेळा जैविक कीटकनाशकां ची फवारणी करावी. Bhendi Lagwad Mahiti in Marathi
तर चला आपण कीड बद्दल माहिती बघितली आता आपण रोगांची माहिती पाहूया.
केवडा :

- केवढा हा भेंडीवरील विषाणूजन्य रोग आहे.
- या रोगाला येल्लो व्हेन मौजेक सुद्धा म्हणले जाते.
- या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भेंडीच्या पानांच्या शिरा पिवळसर पडू लागतात आणि पानाचा इतर राहिलेला भाग हिरवा पिवळट दिसतो.
- भेंडीचे फळ देखील पिवळे दिसते.
- हा रोग पांढरी माशीच्या माध्यमातून पसरतो.
- या रोगावर नियंत्रण करण्यासाठी पांढऱ्या माशीला नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे.
- त्यासाठी शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा एकरी 18 ते 20 चिकट सापळे लावावेत आणि जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी. Bhendi Lagwad Mahiti in Marathi
भुरी :

- हा रोग बुरशीजन्य असून दमट वातावरणामध्ये याचा प्रादुर्भाव भेंडीच्या झाडावर जास्त दिसून येतो.
- सर्वप्रथम पानावर लहान लहान पांढरे डाग पडतात.
- नंतर ते दाग मोठे होऊन संपूर्ण पानावर पांढरी भुकटी पडल्यासारखे दिसते.
- रोगाच्या जास्त प्रादुर्भावामुळे पाने सुकून पडतात आणि फळे गळतात या रोगावर नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा. Bhendi Lagwad Mahiti in Marathi
काढणी
- भेंडीची लागवड केल्यानंतर 40 ते 45 दिवसांमध्ये भेंडीच्या झाडाला फुले येतात आणि फुले आल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये फळे मिळतात.
- भेंडी कोवळी आणि लुसलुशीत असताना त्याची काढणी करावी.
- भेंडीची काढणी एक दिवसाआड केल्याने भेंडी जास्त जुण होत नाही.
- भेंडीला जास्त दिवस ठेवून जुण होऊन देऊ नये.
- अशा भेंडीला बाजारामध्ये भाव मिळत नाही.
- भेंडीची तोडणी सकाळी केल्यानंतर भेंडीचा ताजेपणा रंग आणि त्याचे तेज जास्त काळ टिकून राहतो.
- भेंडी काढल्यानंतर सावली मध्ये ठेवावी आणि स्वच्छ पुसून बाजारात पाठवावी. Bhendi Lagwad Mahiti in Marathi
तुम्ही भेंडी ची शेती करता का? कशाप्रकारे करता? Bhendi Lagwad Mahiti in Marathi ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या माझी शेती या अधिकृत वेबसाइट ळा भेट द्यायला अजिबात विसरू नका.
धन्यवाद!