Agro News Today Marathi
Agro News Today Marathi: आता सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. कारण शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे शेतमालाचे भाव हे जागतिक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे सरकारने अशा शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बुधवारी (दि. २४ सप्टेंबर) व्यक्त केले आहे.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच शेती संबंधी बातम्या हव्या असतील तर आपल्या माझी शेती या व्हाटसप्प ग्रुप ला लगेच जॉइन व्हा.
माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
मराठवाडा पाऊस बातम्या
सध्या पूर्ण राज्यामध्ये आणि त्यामध्ये जास्तीत जास्त मराठवाडा मध्ये पावसाने खूप धुमाकूळ घातला आहे. आणि मोठ्या प्रमाणावर पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कित्येक हेक्टर उभ्या पिकांचे नुकसान झाले आहेत. लाखों रुपयाचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. तर अशामद्धे नितीन गडकरी काय म्हणाले वाचा पुढे सविस्तर.
‘दुसऱ्या इंडिया बायो-एनर्जी अँड टेक एक्स्पो’मध्ये संबोधित करताना ते म्हणाले की, साखरेचा भाव ब्राझील, तेलाचा भाव मलेशिया, मक्याचा भाव अमेरिकेवर अवलंबून आहे. तर सोयाबीनचे भाव अर्जेंटिनामुळे प्रभावित होतात.
“जागतिक अर्थव्यवस्थेच्या या परिस्थितीत कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळत नसल्याने देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागात गरिबी आणि बेरोजगारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे,” असे गडकरी म्हणाले.
ही बातमी वाचा : Maharashtra Construction Workers Scheme: बांधकाम कामगारांसाठी खास कल्याणकारी योजना; मिळत आहेत मोफत घरूपयोगी वस्तु
आपल्या भारतातील 65 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे योगदान केवळ १४ टक्के आहे. अशा परिस्थितीत, आपली ग्रामीण भागातील शेती आणि आदिवासी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आपल्याला शेतीला आधार देण्याची गरज आहे. जी ग्राहकांसाठी, देशासाठी आणि तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे,” असे त्यांनी नमूद केले.
जेव्हा सरकारने मक्यापासून बायो-इथेनॉलचे उत्पादन घेण्यास मंजुरी दिली; तेव्हा मक्याचा भाव प्रति क्विंटल १,२०० रुपयांवरुन २,८०० रुपयांवर गेला, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. “शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते,” असेही त्यांनी नमूद केले. Agro News Today Marathi
कृषीचे विविधीकरण का गरजेचे आहे?
बोलताना ते पुढे म्हणाले, ”शेतकऱ्यांना मक्यापासून इथेनॉल निर्मितीतून अतिरिक्त ४५ हजार कोटी रुपये मिळाले. म्हणूनच, ऊर्जा आणि वीज क्षेत्राच्या दिशेने कृषीचे विविधीकरण करणे ही देशाची गरज आहे. देशात पर्यायी इंधन आणि जैवइंधनाला भविष्यात मोठा वाव आहे.”
सध्या, आपण ऊर्जेचे आयातदार आहोत. त्यासाठी असा दिवस यायला हवा; जेव्हा आपण ऊर्जेचे निर्यातदार होऊ आणि ती देशासाठी सर्वात महत्त्वाची अशी ऐतिहासिक कामगिरी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भारतातील हवा प्रदूषणाबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, ४० टक्के हवा प्रदूषण वाहतूक इंधनामुळे होते. ही देशासाठी, विशेषतः राजधानी दिल्लीतील एक मोठी गंभीर समस्या आहे. आम्ही देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी काम करत आहोत. Agro News Today Marathi
Agro News Today Marathi तुमच्या गावातील ग्रुप्स वर आणि मित्र आणि नातेवाईकांना. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या माझी शेती या वेबसाइट ला अवश्य भेट देत जा.
ही बातमी वाचा :