Agristack Scheme: कृषि विभागच्या योजणांसाठी 15 एप्रिल पासून शेतकरी ओळख क्रमांक बांधनात्मक!

Agristack Scheme In Marathi

agristack scheme

मित्रांनो कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये एकूण शेतकऱ्यांची संख्या ही 1 कोटी 71 लाख आहे. आणि यामधून 11 लाख शेतकऱ्यांचा (Agristack Scheme) शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यात आला आहे म्हणजेच 60 ते 65 टक्के शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. आणि आता कृषी विभागाच्या योजनांसाठी 15 एप्रिल 2025 पासून शेतकऱ्यांचे हे ओळख क्रमांक अनिवार्य असणार आहेत.

अन्यथा शेतकऱ्यांना ओळख क्रमांक शिवाय कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्ही अजून तुमचे शेतकरी ओळख क्रमांक बनवला नसेल तर लवकरात लवकर अग्रेसर पोर्टलवर नोंदणी करा. असं आवाहन कृषी विभागाने केले आहे. पुढे तुम्हाला फार्मर आयडी कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन नेमकी काय आहे त्याची पूर्ण माहिती मिळणार आहे.

आपला माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

Farmer ID Card Online Registration

राज्यामध्ये 1 कुठे 71 लाख शेतकऱ्यांमधून 60 ते 65 टक्के शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक तयार केला आहे परंतु अजूनही बरेच शेतकरी यापासून वंचित आहेत. अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक तयार केला नाही त्यांनी जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन यासाठी त्यांची नोंद करून घ्यायची आहे.

यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. जी सी एस सी चालक आहेत त्यांना एका अर्जासाठी पंधरा रुपये सरकारमार्फत दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सीएससी चालकांना शुल्क देण्याची गरज नाही. अशी माहिती देखील कृषी विभागाने दिली आहे.

कारण राज्यात बऱ्याच जिल्ह्यात अनेक ठिकाणी सीएससी चालक हे शेतकऱ्यांकडून शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्याचे शंभर ते दीडशे रुपये घेत आहेत. आणि याची तक्रार बऱ्याच शेतकऱ्यांनी देखील केली आहे. मात्र कृषी विभागाने या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी कोणतेही शुल्क देऊ नये असे आवाहन केले आहे.

शेतकरी ओळख क्रमांक काय आहे?

मित्रांनो तुम्हालाही असा विचार आला असेल की शेतकरी ओळख क्रमांक नेमकं आहे तरी काय? तर‘ॲग्रीस्टॅक’ म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली. यात प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक (Unique Farmer ID) दिला जातो. या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. तसेच, पीककर्ज, विमा, अनुदान, खत व बियाणे या सर्व बाबतीत ही योजना उपयुक्त ठरेल.

तर चला आता आपण पाहूया की या योजनेचा नेमकं शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे आणि याची प्रक्रिया कशी असणार आहे.

Agristack Scheme

Agristack Scheme
Agristack Scheme

योजनेचे स्वरूप आणि फायदे : पुढे तुम्हाला Agristack Scheme या योजनेचे स्वरूप आणि फायदे यांची पूर्ण माहिती दिली आहे.

थेट लाभ हस्तांतरण (DBT) :

पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत इत्यादी अनुदाने थेट बँक खात्यात जमा होतील. यामुळे मध्यस्थांची गरज भासणार नाही, पारदर्शकता राहील.

शेतीसाठी अनुदान आणि इतर सुविधा

खत, बियाणे व औषधांसाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळेल.हवामान अंदाज, मृदा परीक्षण, सिंचन योजना यांची माहिती सहज उपलब्ध होईल.

पीककर्ज व विम्यासाठी सोपी प्रक्रिया :

पीक विमा आणि कर्ज मिळवण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. हे एक ओळखपत्र परिपूर्ण ठरेल. ॲग्रीस्टॅकमधील नोंदीनुसार कर्ज मंजुरी जलद गतीने होईल.

नैसर्गिक आपत्ती व शेतीसाठी मदत :

दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी किंवा कोणत्याही आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीसाठी शेतकऱ्यांची माहिती आधीच उपलब्ध असेल, त्यामुळे मदतीचे वाटप जलदगतीने होईल.

या योजनेच्या नोंदणीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिबिरांचे आयोजन केले गेले आहे. महसूल, कृषी व जिल्हा परिषद विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे ही नोंदणी केली जाईल.

Agristack Scheme Document

agristack scheme

नोंदणी प्रक्रिया पूर्णत : मोफत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता नोंदणी करून घ्यावी.

आवश्यक कागदपत्रे : नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढे दिले आहे.

  • आधार कार्ड
  • आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक
  • सातबारा उतारा (७/१२)

मित्रांनो Agristack Scheme ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत लवकरात लवकर शेअर करा जेणेकरून ते देखील या नोंदणीसाठी जवळच्या सीएससी सेंटरला भेट देतील. आणि राज्यातील व देशातील अशा शेतीच्या महत्त्वाच्या अपडेट साठी आपल्या माझी शेती या वेबसाईटला आवश्यक भेट देत जा.

धन्यवाद!

ही अपडेट पहा :