Ahilyanagar Agri News Marathi
Ahilyanagar Agri News Marathi: मित्रांनो शेतकरी दिवसेंदिवस शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. श्रीगोंद्यातील कोथिंबीरे कुटुंबाने एका एकरात 250 जांभळांची झाडे लावून सेंद्रिय पद्धतीने 15 ते 20 टन उत्पादन घेतले. आणि लाखों रुपये कमावले आहेत. कारण सध्या मुंबई-पुण्यात विक्री करून यावर्षी 300 रुपये किलोचा उच्च दर मिळत आहे. आणि याचा फायदा घेऊन अहिल्यानगर मधील हे कुटुंब चांगले चर्चेत आले आहे.
मित्रांनो तुम्हाला अशाच शेतीशी संबंधित बातम्या हव्या असतील तर आपल्या ग्रुप ला लगेच जॉइन करा. कारण अशाच अपडेट तुम्हाला मिळत राहतील. पुढे पाहूया की नेमके या शेतकऱ्याने किती रुपये आणि कशा पद्धतीने कमावले ते.
| माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
जांभूळ शेतीची सुरुवात आणि लागवड
नऊ वर्षांपूर्वी संपत आणि ओम कोथिंबीरे यांनी श्रीगोंदा येथील आपल्या शेतात कोकण बाडॉली वाणाच्या जांभळाची लागवड केली. आणि त्यांनी कुठूनही रोपे विकत न आणता त्यांनी घरच्या घरी रोपे तयार करून एका एकरात 15 बाय 15 फुट अंतरावर 250 झाडे लावली. आणि झाडे लाऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर त्या झाडाला फळे यायला सुरुवात झाली.
त्यानंतर कोथिंबीरे यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून शेणखताचा वापर केला, तर अत्यंत आवश्यकता असल्यासच कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा वापर केला. जांभळाच्या झाडांना फारशी फवारणी लागत नसल्याने त्यांचा उत्पादन खर्च कमी राहतो.
हे वाचा : Pik Vima Bharpai: पीक विमा भरपाईचे 3720 कोटी रुपये मिळणार, शेतकऱ्यांना मिळाले 3126 कोटी.
आणि पाण्याचे व्यवस्थापनही त्यांनी ठिबक सिंचन आणि काही वेळा फ्लड सिंचनाद्वारे व्यवस्थित केले आहे. जांभळाचा बहार वर्षातून एकदाच येतो, आणि फळांची काढणी एक ते दीड महिना चालते. तर पुढे सेंद्रिय शेती आणि कमी खर्चाचे तंत्र कोथिंबीरे परिवाराने कशा पद्धतीने उपयोगात आणले ते पाहू.
सेंद्रिय शेती आणि कमी खर्चाचे तंत्र
कोथिंबीरे कुटुंबाने जांभूळ शेतीत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला आहे. शेणखताचा वापर आणि रासायनिक खतांचा कमीत कमी वापर यामुळे त्यांचा उत्पादन खर्च नियंत्रणात राहतो. जांभळाच्या झाडांना विशेष काळजीची गरज नसल्याने आणि फवारणी कमी लागत असल्याने शेतीचा खर्च कमी होतो. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर केला जातो, ज्यामुळे पाण्याची बचत होते आणि झाडांना नियमित पाणीपुरवठा मिळतो.
कोथिंबीरे यांनी सांगितले की, जांभूळ शेती परवडण्यासाठी किमान 50 रुपये प्रति किलोचा भाव आवश्यक आहे, परंतु त्यांना दरवर्षी यापेक्षा जास्त भाव मिळतो. यंदा तर 300 रुपये प्रति किलोचा उच्चांकी भाव मिळाल्याने त्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
बाजारपेठ आणि विक्री व्यवस्थापन
शेतीमध्ये उत्पादन घेत असताना सगळ्यात महत्वाचे असते ते पिकासाठी बाजारपेठ आणि विक्री व्यवस्थापन. शेतमालाचे उत्पादन घेणे सोपे असले, तरी त्याला योग्य बाजारपेठ मिळवणे हे मोठे आव्हान आहे. कोथिंबीरे कुटुंबाने यासाठी मुंबई आणि पुणे येथील बाजारपेठांचा शोध घेतला. आणि या दोन्ही शहरांमध्ये जांभळाला चांगला भाव मिळतो, आणि वाहतूक खर्चही कमी होतो.
त्यांनी या बाजारपेठांमध्ये नियमित विक्री सुरू केली, ज्यामुळे त्यांना प्रत्येक हंगामात चांगले उत्पन्न मिळते. याशिवाय, जांभळाची आकर्षक पॅकेजिंग करून ते विक्रीसाठी पाठवतात, ज्यामुळे फळांचे नुकसान टळते आणि चांगला भाव मिळतो. या नियोजनबद्ध दृष्टिकोनामुळे कोथिंबीरे यांना शेतमालाच्या विक्रीत सातत्याने यश मिळत आहे.
जांभूळ हे खूपच नाजुक फळ आहे. जर त्याचे व्यवस्थानपण योग्य पद्धतीने नाही नाही केले तर ते खूप लवकर खराब होते. तर या कुटुंबाने नेमके या फळाचे व्यवस्थापन कश्या पद्धतीने केले त्याची माहिती पहा.
तर कोथिंबीरे यांनी जांभूळ शेतीतून यश मिळवण्यासाठी पॅकेजिंगवर विशेष लक्ष दिले आहे. फळांची योग्य पॅकेजिंग केल्याने वाहतुकीदरम्यान नुकसान टळते आणि बाजारपेठेत आकर्षक सादरीकरणामुळे चांगला भाव मिळतो. यामुळे त्यांचा शेतमाल उच्च दर्जाचा राहतो आणि ग्राहकांमध्ये मागणी वाढते.
हेही वाचा : Mirchi Lagwad Mahiti: अशा पद्धतीने मिरची लागवड केली तर होईल फायदा! पहा पूर्ण माहिती
एका एकरातून 15 ते 20 टन जांभूळ उत्पादन मिळते, आणि यंदा 300 रुपये प्रति किलोचा भाव मिळाल्याने त्यांचे उत्पन्न लाखोंच्या घरात गेले आहे. कमी खर्च आणि चांगल्या बाजारपेठेच्या जोरावर जांभूळ शेती त्यांच्यासाठी मालामाल करणारी ठरली आहे.
ही माहिती तुमच्या गावातील लोकांना नक्की शेअर करा. जेणेकरून जर कोणी जांभूळ शेती करण्याचा विचार करत असतील तर त्यांना या यशाबद्दल माहिती मिळेल. आणि त्यांना थोडीसी मदत होईल.
ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या माझी शेती या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यायला अजिबात विसरू नका.
हेही वाचा :
धन्यवाद!
