Manikrao Kokate: कृषिमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकर्‍यांना सुनावलं, नंतर दाखवली दिलगिरी; पहा काय झाले

Table of Contents

Manikrao Kokate News

कर्जमाफीच्या (loan waiver ) मुद्यांवर बोलताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांनी राज्यातील शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले होते. आणि त्याची चर्चा राज्यभरात चालू होती. त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून कृषीमंत्र्यांवर टीकेची झोड उठली होती.

त्यांनी अस वक्तव्य केल होत की “कर्ज घ्यायच आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफी ची वाट बघायची. तोपर्यंत कर्ज भरायच नाही. कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाच तुम्ही काय करता? साखरपुढे आणि लग्न?” आणि अशा व्यक्तव्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली.

मात्र मी शेतकऱ्यांबाबत असं वक्तव्य केलं नाही, असेही कोकाटे यांनी म्हटलंय. आणि नाशिक येथे अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तेथे त्यांनी अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली. यावेळी बोलताना कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल कर्जमाफीच्या मुद्यांवर बोलताना भाष्य करत खडे बोल सुनावले होते.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

अशातच कृषीमंत्री Manikrao Kokate आज पुन्हा नाशिकच्या अवकाळी आणि गारपीटग्रस्त भागांचा दौरा करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आज पुन्हा बळीराजाच्या बांधावर पुढे आलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील बागलान, सटाणा परिसरात जाऊन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पाहणी करणार होते.

या परिसरात दोन दिवसांपूर्वी जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. ज्यामुळे कांदा, डाळ, टोमॅटो, गहू आणि भाजीपाला पिकाचं मोठे नुकसान झाला आहे. जिल्ह्यात जवळपास 4500 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. तर या अवकाळीमुळे सर्वाधिक फटका हा कांदा पिकाला बसला आहे. आणि अशातच कांद्यालाही हवा तो भाव मिळत नाहीये. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहे.

दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या माडसांगवी परिसरातील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आणि त्या झालेल्या नुकसानाची पाहणी माणिकराव कोकाटे यांनी केली होती. याच दौऱ्या दरम्यान कर्ज माफीबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अशातच आता कृषीमंत्री पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या बांधावर जात आहेत.

मित्रांनो अशाच शेतीविषय बतम्यासाठी आपला माझी शेती ग्रुप लगेच जॉइन करा.

आपला माझी शेती ग्रुपJoin Now

माणिकराव कोकाटे वक्तव्य

Manikrao Kokate

नेमकं काय म्हणाले होते Manikrao Kokate?:

नाशिक येथे अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तेथे त्यांनी अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली. यावेळी बोलताना कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल कर्जमाफीच्या (loan waiver) मुद्यांवर बोलताना भाष्य करत खडे बोल सुनावले होते.

यावेळी ते म्हणाले होते की, जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचं नाही असे मामिकराव कोकाटे म्हणाले. तसेच कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का? असा सवाल त्यांनी केला होता.

सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा,” असं विधान Manikrao Kokate यांनी केलं होतं.

त्यांच्या या व्यक्तव्याने शेतकरी संतापले देखील होते. कित्येक सोशल मीडिया च्या द्वारे लोक संताप व्यक्त करत होते. कारण सध्या कोणत्याही शेती मालाला हवा तसा भाव मिळत नाहीये. आणि त्यामध्ये कृषि मंत्र्यांच अस वक्तव्य.

धन्यवाद!

Leave a Comment