Nuksan Bharpai Parbhani: परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३७४ कोटींचा मदत निधी मंजूर

Table of Contents

नुकसान भरपाई परभणी

Nuksan Bharpai Parbhani

Nuksan Bharpai Parbhani : यंदाच्या (२०२५) जून ते सप्टेंबर या चार महिन्यांदरम्यान परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३७४ कोटी १९ लाख ८६ हजार रुपये निधी वितरणासाठी मंजुरी दिली आहे. तर पुढे तुम्ही कोठे किती नुकसान भरपाई मंजूर झाली आहे पाहू शकता.

आणि जर तुम्हाला राज्यातील व देशातील अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला माझी शेती व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट थेट तुमच्या व्हाटसप्प वर मिळतील.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

Nuksan Bharpai Parbhani 2025

  • यामध्ये, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील अतिवृष्टी आणि पुरामुळे परभणी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, आणि पूर्णा या सहा तालुक्यांतील ३९१ गावांमध्ये नुकसान झाले होते. या नुकसानीत २ लाख ३८ हजार ५३० शेतकऱ्यांचे जिरायती, बागायती आणि फळपिके मिळून एकूण १ लाख ५१ हजार २२२ हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झाले होते.
  • तसेच, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे परभणी जिल्ह्यातील ८२४ गावांमध्ये पीक नुकसान झाले. या नुकसानीपोटी ४ लाख ३९ हजार २९७ शेतकऱ्यांना त्यांच्या २ हेक्टरच्या मर्यादेत २४५ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपये निधी वितरणास महसूल व वन विभागातर्फे मंजुरी देण्यात आली आहे.

या मंजूर निधीमुळे जिल्ह्यातील पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. Nuksan Bharpai Parbhani

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

ही बातमी वाचा :