Nuksan Bharpai Nanded: नांदेडच्या शेतकऱ्यांसाठी २८.५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर! या तालुक्याला सर्वात जास्त..

Nuksan Bharpai Nanded News Marathi

Nuksan Bharpai Nanded: राज्य सरकारने आता झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानामुळे राज्यामध्ये नुकसान भरपाई वितरणाला सुरुवात केली आहे. या झालेल्या अतिवृष्टी मध्ये नांदेड जिल्ह्यात देखील पीक नुकसानीचे मोठे संकट आले होते. या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २८ कोटी ५२ लाख रुपयांचा (₹२८.५२ कोटी) निधी मंजूर केला आहे.

पुढे पाहू शकता की जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला किती नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे सगळी माहिती वाचा आणि अशाच महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट साठी आपल्या माझी शेती व्हाट्सअप चॅनल जॉईन करा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

नुकसान भरपाई नांदेड

Nuksan Bharpai Nanded

मुख्य माहिती:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now
  • बाधित क्षेत्र आणि शेतकरी: सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७३ हेक्टर क्षेत्रातील जिरायती, बागायती आणि फळपिकांचे नुकसान झाले. यात एकूण १ लाख २६ हजार ५६७ शेतकरी बाधित झाले आहेत.
  • भरपाई प्रक्रिया: जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाकडून मंजूर झालेला हा २८.५२ कोटी रुपयांचा निधी लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केला जाईल. Nuksan Bharpai Nanded

ही बातमी वाचा : Karj Mafi Maharashtra: काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ‘जनआक्रोश मोर्चा’; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी

नांदेड तालुकानिहाय मंजूर निधी (एकूण २८.५२ कोटी):

तालुकामंजूर निधी (कोटी रु.)
हदगाव५.५८
किनवट५.१९
उमरी३.४३
हिमायतनगर३.००
लोहा३.००
भोकर२.०६
माहूर२.६३
बिलोली१.६६
नांदेड१.१०
कंधार०.३७ (३७.१४ लाख)
धर्माबाद०.१६ (१६.२२ लाख)
अर्धापूर०.०९ (९.५२ लाख)
नायगाव०.०० (४५ हजार)

या आपत्तीत एक लाख २६ हजार ५६७ शेतकऱ्यांना बसला. यात बाधितांचा २८ कोटी ५२ लाख ३७ हजार ५० रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. हा निधी शासनाने गुरुवारच्या शासन आदेशानुसार मंजूर केला आहे. हा निधी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ही बातमी वाचा :