Milk Rate : ‘गोकुळ’ची शेतकऱ्यांसाठी खास ‘दिवाळी भेट’! दूध दरात वाढ, पशुखाद्यावर मोठी सवलत

Table of Contents

Gokul Dairy Hike Milk Rate

Gokul Dairy Hike Milk Rate: आता दिवाळी चे दिवस सुरू झाले असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यातील प्रमुख सहकारी दूध संस्था असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाने आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच एक अत्यंत आनंदाची आणि मोठी भेट जाहीर केली आहे. पहा नेमकी काय भेट आहे शेतकऱ्यांसाठी आणि अशाच माहितीसाठी आपला माझी शेती व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

आजचे दुधाचे भाव

Gokul Dairy Hike Milk Rate

शेतकऱ्यांसाठी काय आहे भेट?

  1. दूध खरेदी दरात वाढ:
    • म्हैस आणि गाईच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ करण्यात आली आहे.
    • या दरवाढीमुळे म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ५१.५० रुपयांवरून ५२.५० रुपये आणि गाईच्या दुधाचा दर ३३ रुपयांवरून ३४ रुपये झाला आहे.
    • हे नवे दर २१ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.
  2. पशुखाद्याच्या दरात कपात:
    • शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, यासाठी पशुखाद्याच्या दरातही मोठी कपात करण्यात आली आहे.
    • ‘गोकुळ’च्या ५० किलोच्या पशुखाद्य पोत्याच्या किमतीत थेट ५० रुपयांची सवलत जाहीर करण्यात आली आहे.
    • या निर्णयामुळे ‘महालक्ष्मी गोल्ड’ आणि ‘कोहिनूर डायमंड’ या पशुखाद्याचे दर कमी झाले आहेत.
  3. संस्थांनाही दिलासा:
    • दूध संकलन करणाऱ्या प्राथमिक दूध संस्थांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये (व्यवस्थापन खर्चात) १० पैशांची वाढ करण्यात आली आहे. Gokul Dairy Hike Milk Rate

ही बातमी वाचा : Aivrushti Madat GR : 23 जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने निधी वाटपास दिली मान्यता, शासन निर्णय प्रसिद्ध

या निर्णयाचा फायदा काय?

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

‘गोकुळ’ने घेतलेल्या या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. वाढलेल्या दूध दरामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि पशुखाद्यावर मिळालेल्या सवलतीमुळे त्यांच्या खर्चात बचत होणार आहे.

गोकुळच्या या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादकांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचा विकास हेच आपले मुख्य उद्दिष्ट आहे, हे गोकुळने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतरी खुश होणार आहेत. Gokul Dairy Hike Milk Rate

ही बातमी वाचा :