Dhandhanya Krushi Yojana Maharashtra
Dhandhanya Krushi Yojana: शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘पंतप्रधान धनधान्य कृषी’ या मोठ्या योजनेत महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता या जिल्ह्यांमध्ये शेतीचा विकास करण्यासाठी खास आणि मोठा आराखडा (प्लॅन) तयार केला जाणार आहे.
तर या योजनेमद्धे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे आणि कोणते 9 जिल्हे यामध्ये समाविष्ट असणार आहेत. त्याची माहिती पुढे पाहू शकता. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला माझी शेती व्हाटसप्प चॅनल जॉइन करू शकता.
| माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
धन धान्य कृषी योजना

पुढील 9 जिल्ह्यांचा समावेश: या योजनेसाठी देशभरातून 100 जिल्हे निवडले आहेत, त्यात आपल्या महाराष्ट्रातील हे ९ जिल्हे आहेत: पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. पण या जिल्ह्यांची निवड कशाच्या आधारावर करण्यात आली आहे ते पहा.
निवड कशाच्या आधारावर झाली? ज्या जिल्ह्यांमध्ये शेतीत उत्पादन कमी आहे, पाण्याची (सिंचनाची) सोय अपुरी आहे, शेतकऱ्यांना कर्ज सहज मिळत नाही आणि जेथे जास्त शेतकरी खातेदार आहेत, अशा निकषांवर ही निवड करण्यात आली आहे. Dhandhanya Krushi Yojana in Marathi
ही बातमी वाचा : Nuksan Bharpai 2025: सप्टेंबरमधील पीकनुकसानीपोटी 64 कोटी 61 लाख रुपये निधी वितरणास मंजुरी; या दिवसापासून…
धन धान्य कृषी योजना आराखड्यात कशावर लक्ष असेल?
आता फक्त पिकं वाढवून चालणार नाही, तर पिकं काढल्यानंतरच्या समस्यांवर लक्ष दिले जाईल:
- साठवणूक: धान्य ठेवण्यासाठी गोदामांची (Storage) सोय वाढवणे.
- प्रक्रिया आणि मूल्यवर्धन: पिकांवर प्रक्रिया करून त्यांची किंमत वाढवणे.
- बाजारपेठ (Marketing): शेतमाल चांगल्या दरात विकता यावा यासाठी सोयी निर्माण करणे.
या योजनेची मोठी गोष्ट म्हणजे, आता कृषी विभागासोबत इतर सरकारी विभागही एकत्र येऊन काम करणार आहेत. या नऊ जिल्ह्यांसाठी खास ‘जिल्हा विकास आराखडा’ तयार केला जाईल, ज्यामुळे सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल. नीती आयोग स्वतः या कामावर लक्ष ठेवणार आहे.
शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा: जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समित्या या योजनांची जबाबदारी घेतील. पण विशेष म्हणजे, या समित्यांमध्ये अधिकारी, शास्त्रज्ञ आणि बँकांचे प्रतिनिधी यांच्यासोबत प्रगतीशील (हुशार) शेतकऱ्यांनाही समाविष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या योजनेचा मुख्य उद्देश आहे की, नैसर्गिक साधनसंपत्ती (जमीन, पाणी) जपून पीक उत्पादकता वाढवायची आणि कडधान्यांमध्ये आपण दुसऱ्या देशावर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण व्हायचे. Dhandhanya Krushi Yojana
ही बातमी वाचा :
