Flood Damage Relief: पशुधनासाठी राज्य सरकारची मदत जाहीर; प्रति दुधाळ जनावरासाठी मिळणार 37,500 रुपये!

Flood Damage Relief Maharashtra

Flood Damage Relief: आता गेले काही दिवासपूर्वी राज्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आणि यामुळे राज्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली असून काही ठिकाणी जीवितहानीचीही प्रकरणे नोंदली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर आज मंगळवार (ता.७) झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 32 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. यातून शेतीचे, जनावरांचे आणि घरांचेनुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

तर पुढे वाचा सर्व माहिती सविस्तर आणि अशाच शेती संबंधी अपडेट साठी आपला माझी शेती व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळत राहतील.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

पशुधन सरकारी मदत 2025

Flood Damage Relief

पत्रकार परिषदेत, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की शंभर टक्के भरपाई देणे शक्य नसले तरी शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी सरकार होईल तेवढे प्रयत्न करत आहे. यात, सरकारने अतिवृष्टीग्रस्त भागात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. या परिस्थितीत तातडीच्या मदतीतून शेतकऱ्यांना अन्नधान्य किट्स (गहू आणि तांदूळ) तसेच इतर स्वरूपातील साहाय्य दिले आहे. 

राज्यात खरीप हंगामात सुमारे १ कोटी ४३ लाख ५२ हजार २८१ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली असून, त्यापैकी ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीचा फटका बसला आहे. २९ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या भागांना प्राधान्याने मदत देण्यात येणार आहे. तसेच २,०५९ मंडळांमधील पिक नुकसानीसाठी थेट आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. Flood Damage Relief Maharashtra

ही माहिती वाचा : Agro News Today Marathi: शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव का मिळत नाही?; गडकरींनी सांगितलं खरं कारण

दुधाळ आणि शेतीकाम करणाऱ्या जनावरांसाठी आर्थिक मदत

मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने गोठ्यांसाठी स्वतंत्र मदत देण्याचा निर्णय घेतला असून, दुधाळ जनावरांच्या नुकसान भरपाईसाठी ३७ हजार ५०० रुपये प्रति जनावर मदत देण्यात येणार आहे. तसेच, याआधी एनडीआरएफअंतर्गत असलेली तीन जनावरांपर्यंतची मदत मर्यादा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या सर्वच जनावरांसाठी ही नुकसान भरपाई दिली जाईल.

तसेच शेतीकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२ हजार रुपये प्रति जनावर नुकसान भरपाई मिळेल, तर कुक्कुटपालनासाठी १०० रुपये प्रति कोंबडी या दराने मदत दिली जाणार आहे.

नुकसानग्रस्त विहिरींसाठी मदत

तसेच, ते पुढे म्हणाले की, बाधित विहिरींसाठी एनडीआरएफचे निकष लागू नसतानाही राज्य शासनाने विहिरींमध्ये गाळ भरलेल्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत शेतकऱ्यांना विहिरीतील गाळ काढण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. Flood Damage Relief Maharashtra

जमिनी, घरे आणि दुकानांसाठी भरपाई मिळणार

त्याचप्रकारे घर, झोपड्या आणि दुकानांच्या नुकसानीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची स्वतंत्र आर्थिक मदत मिळणार आहे. राज्यातील २५३ तालुक्यांतील सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाणार आहे. तसेच, खरडून गेलेल्या जमिनीसाठी ४७ हजार रुपये प्रति हेक्टर तर मनरेगाअंतर्गत शेती सुधारणा कामांसाठी ३ लाख रुपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी यांनी दिली. Flood Damage Relief Maharashtra

ही बातमी वाचा :