Beed Railway News in Marathi

Beed Railway: अहमदनगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन झाल्याने बीड जिल्ह्यातील दीर्घकाळापासूनचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनामुळे बीडकरांमध्ये मोठा उत्साह आहे. बीड शहर आणि जिल्ह्यासाठी रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने अहमदनगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गावर पहिली प्रवासी रेल्वे धावली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अहमदनगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बीडकरांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बीड जिल्ह्याला रेल्वे मार्गाशी जोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. दिवंगत नेत्या केसरकाकू क्षीरसागर यांनी पहिल्यांदा ही मागणी केली होती. त्यानंतर, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि इतर नेत्यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
Beed Train Time Table
बीड रेल्वे चे वेळापत्रक : बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या रेल्वे प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी बुधवारी (ता. १७) पूर्ण होत आहे. तब्बल चाळीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीडकरांना बीड ते अहिल्यानगर असा प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हिरवा झेंडा दाखवतील आणि ही रेल्वे सेवा सुरू होईल, बीडकरांचे स्वप्न पूर्णत्वाला जाईल. दरम्यान, परळीकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागेल.
बीड रेल्वे एकूण स्थानके

अहिल्यानगर-परळी रेल्वे प्रकल्पांतर्गत सुरू होणाऱ्या या डेमू रेल्वेला अहिल्यानगर ते बीडदरम्यान १६ स्थानके आहेत. नगरहून सुटलेली गाडी नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी, अमळनेर (भांड्याचे), रायमोह, एगनवाडी, जाटनांदूर, राजुरीमार्गे बीड येथे पोचेल.
असे आहे वेळापत्रक : अहिल्यानगरहून सकाळी ६:५५ ला रेल्वे सुटेल व दुपारी १२:३० ला बीडला पोचेल. परतीच्या प्रवासात बीडहून ती दुपारी एकला सुटेल आणि सायंकाळी साडेसहाला अहिल्यानगरला पोचेल. आठवड्यात सहा दिवस ही गाडी धावणार असून रविवारी विश्रांती असेल.
सध्या डिझेलवर; नंतर विजेवर : Beed Railway साठी महापारेषणकडून वीज घेतली जाणार आहे. त्यासाठी २३२ केव्हीए क्षमतेच्या दोन उपकेंद्रांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे डिझेलवर धावणार असल्याने वेग काहीसा कमी असेल. विद्युतीकरणानंतर हा प्रवास वेगवान होईल.
हेही वाचा : Maharashtra Construction Workers Scheme: बांधकाम कामगारांसाठी खास कल्याणकारी योजना; मिळत आहेत मोफत घरूपयोगी वस्तु
स्वस्तात प्रवास पण शहरापासून दूर : अहिल्यानगर-बीड हा प्रवास स्वस्तात म्हणजे ४५ रुपयांत होणार आहे. मात्र, रेल्वेस्थानक शहरापासून दूर असल्याने तिथपर्यंत रिक्षाने जाण्यासाठी याहून अधिक पैसै मोजावे लागण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाचा खर्च गगनाला : ४० वर्षांपूर्वी मागणी असलेल्या या लोहमार्गाला १९९५ मध्ये तांत्रिक मान्यता मिळाली. त्यावेळी प्रकल्पाचा खर्च ३५५ कोटी रुपये होता. हा प्रकल्प विविध कारणांमुळे लांबला. सध्या प्रकल्पाचा खर्च तब्बल ४८०० कोटींवर पोचला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार निम्मा व केंद्र सरकार निम्मा खर्च करत आहे. राज्य सरकारने आतापर्यंत २२४१ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
या रेल्वेच्या उद्घाटनामुळे बीड जिल्ह्यासाठी विकासाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने निधी देऊन बीडकरांची स्वप्नपूर्ती केली आहे.
हेही वाचा :