Maharashtra Construction Workers Scheme: बांधकाम कामगारांसाठी खास कल्याणकारी योजना; मिळत आहेत मोफत घरूपयोगी वस्तु

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra in Marathi

Maharashtra Construction Workers Scheme: मित्रांनो जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण राज्य सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे बांधकाम कामगारांसाठी मोफत घरगुती भांडी योजना राबवली आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगारांना घरातील दैनंदिन गरजा पूर्ण करताना मोठी मदत मिळेल.

या योजनेची तुम्हाला पुढे सर्व माहिती पाहायला मिळेल. जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल. आणि जर तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट थेट व्हाटसप्प वर हव्या असतील तर लगेच आपला ग्रुप जॉइन करा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

Maharashtra Construction Workers Scheme Information In Marathi

राज्य सरकार ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’मार्फत ही बांधकाम कामगार भांडी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी आवश्यक भांडी मोफत दिली जाणार आहेत. या योजनेमुळे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कामगारांना मदत मिळेल. तसेच दैनंदिन गरजा पूर्ण होऊन त्यांचा आर्थिक भार कमी होणार आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

त्यामुळे कामगारांना मोठी मदत होणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू आणि गरीब बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच उपलब्ध करून देणे, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करताना आर्थिक बोजा कमी करणे आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. Maharashtra Construction Workers Scheme

Maharashtra Construction Workers Scheme Benefits

योजनेचा लाभ : Maharashtra Construction Workers Scheme या योजनेचा लाभ पुढीलप्रमाणे होणार आहे.

  • कामगारांना भांडी विकत घ्यावी लागत नाहीत. त्यामुळे त्यांचे पैसे वाचतात.
  • चांगल्या भांड्यांमुळे कामगारांचे जीवनमान सुधारते.
  • सरकार कामगारांना मदत करत असल्याची भावना निर्माण होते.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असल्यामुळे कामगारांना लगेच लाभ मिळतो.
  • घरात लागणारी महत्त्वाची भांडी एकाच वेळी मिळतात.

बांधकाम कामगार योजना पात्रता अटी

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • तो बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा नोंदणीकृत सदस्य असावा.
  • त्याने मागील १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
  • त्याने यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेतून भांड्यांचा लाभ घेतलेला नसावा.

बांधकाम कामगार योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • वयाचा पुरावा (उदा. शाळा सोडल्याचा दाखला)
  • स्वयंघोषणापत्र (की पूर्वी लाभ घेतलेला नाही याकरिता)

बांधकाम कामगार योजना मध्ये काय काय मिळते?

Maharashtra Construction Workers Scheme

योजनेची वैशिष्ट्ये :

  • पात्र कामगारांना घरगुती वापरासाठी आवश्यक भांडी मोफत दिली जातात.
  • कामगारांना सहजपणे अर्ज करता यावा यासाठी प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे.
  • ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र बांधकाम कामगारांसाठी आहे.
  • यात तांब्या, पितळ, आणि स्टीलच्या भांड्यांचा संच दिला जातो, ज्यात कुकर, पातेली, ताट-वाटी, ग्लास इत्यादींचा समावेश आहे.

हे वाचा : Krushi Swavalamban Yojana: 4 लाख पर्यन्त अनुदान! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, “या” शेतकऱ्यांना लाभ

बांधकाम कामगार योजना अर्ज पद्धती

अर्ज करण्याची प्रक्रिया :

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन कामगार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतात. तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास मंडळाचे कार्यालय, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका कार्यालयातून अर्ज मिळवून आवश्यक कागदपत्रांसह तो संबंधित कार्यालयात जमा करता येतो.

शेअर करा Maharashtra Construction Workers Scheme ही माहिती तुमच्या गावातील ग्रुप्स वर आणि मित्र आणि नातेवाईकांना. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या माझी शेती या वेबसाइट ला अवश्य भेट देत जा.

ही अपडेट पहा :