रक्षाबंधनापूर्वी शेतकऱ्यांना मोठ गिफ्ट! 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा पैसे; PM Kisan Samman Nidhi Yojana

PM Kisan Samman Nidhi Yojana

शेतीकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे कारण रक्षाबंधनापूर्वी PM Kisan Samman Nidhi Yojana चे 2000 रुपये केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. रक्षाबंधनापूर्वी केंद्र सरकार शेतकऱ्यांना  मोठी भेट देणार आहे. सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे.

देशातील तब्बल 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार 500 कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पीएम-किसानचा पुढील हप्ता 2 ऑगस्ट रोजी जारी केला जाईल. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी आनंदांची बातमी आहे. अशाच अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

Agriculture News Marathi Today

अशी अपडेट समोर आली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 20 हजार 500 कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 20 वा हप्ता जारी करतील. याचा फायदा देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना होईल. जे शेतकरी 20 व्या हप्त्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही दिलासा देणारी न्यूज आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

ही जी DBT Scheme आहे ही सरकारने 2019 मध्ये सुरू केली. आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत 19 हप्त्यांद्वारे 3.69 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. कृषी मंत्रालयाने सांगितले की, पीएम-किसानचा पुढील हप्ता 2 ऑगस्ट रोजी जारी केला जाईल. 20 व्या हप्त्यात सुमारे 20 हजार 500 कोटी रुपयांची रक्कम 9.7 कोटी शेतकऱ्यांना या हप्त्याची वाटप करण्यात येणार आहे.0

पंतप्रधान त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमादरम्यान PM Kisan Samman Nidhi Yojana हा हप्ता जारी करतील. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील कृषी भवन येथे एक पूर्वतयारी बैठक घेतली. कृषी सचिव देवेश चतुर्वेदी, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एम.एल. जाट आणि कृषी मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

पीएम किसान योजना काय आहे

तर तुम्हाला तर माहितीच असेल की ही योजना नेमकी काय आहे? तर पीएम-किसान योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये मिळतात जे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या उपक्रमाचा उद्देश शेतीयोग्य जमीन असलेल्या लहान आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत प्रदान करणे आहे. 20 वा हप्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

तसेच, त्यांचा आधार त्यांच्या बँक खात्याशी जोडला गेला आहे आणि जमिनीच्या अचूक नोंदी ठेवल्या आहेत याची खात्री करावी लागते. ही योजना सरकारच्या प्रमुख कल्याणकारी उपक्रमांपैकी एक म्हणून उदयास आली आहे. ग्रामीण भारतातील शेतकरी कुटुंबांना ती महत्त्वपूर्ण आर्थिक मदत देते.

ही योजना पहा : Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना बद्दल सर्व माहिती येथे!

पीएम किसान निधी योजना हेल्पलाइन नंबर

जर तुम्ही पण या पीएम किसानचा 20 वा हप्ता ची वाट पाहत असाल तर हा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी अनिवार्य आहे. त्याशिवाय कोणताही निधी जमा होणार नाही. 2019 मध्ये सुरू झालेली पीएम-किसान ही भारतातील सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण योजनांपैकी एक आहे. ती कोट्यवधी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना समाविष्ट करते. समस्यांना तोंड देणारे शेतकरी मदतीसाठी पीएम-किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 011-24300606 वर कॉल करू शकतात.

शेअर करा ही माहिती तुमच्या गावातील इतर ग्रुप आणि मित्रांना व अशाच शेती संबंधीच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या माझी शेती ग्रुप तसेच वेबसाइट ला भेट देत जा.

ही बातमी वाचा :