PM Kisan 20th Installment Date
राज्यातील कित्येक शेतकरी PM Kisan 20th Installment (पीएम किसान 20 वा हप्ता) ची वाट पाहत आहेत. कारण पीएम किसान योजनेचा हप्ता जून महिन्यात जमा झाला नाही. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 20 वा हप्ता जुलै महिन्याच्या या तारखेला जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढची माहिती काळजीपूर्वक वाचा.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्यावेळी हा PM Kisan 20th Installment हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. आता या हप्त्यामध्ये शेतकऱ्याला 2000 हजार रुपये मिळतात पण तेवढ्यानेच शेतकऱ्याला थोडा का होईन आर्थिक मदतीसाठी हातभार लागतो. तर चला पाहूया नेमक कोणत्या दिवशी हा हप्ता जमा होणार आहे.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या माझी शेती व्हाटसप्प ग्रुप ला लगेच जॉइन करा.
माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
PM Kisan Scheme
सध्या पेरणीचे दिवस चालू आहेत आणि काही भागामध्ये पेरणी झाली आहे. तसेच काही ठिकाणी पाऊस येत नसल्याने दुसऱ्यांदा पेरणी करण्याचे दिवस आले आहेत. आणि त्यामुळे अशा परिस्थिति मध्ये 2000 रुपये का होईन पण शेतकऱ्याला त्याने मदत होते. त्यामुळे शेतकरी या PM Kisan 20th Installment ची वाट पाहत आहेत.
पीएम किसान हप्ता तारीख
नेमका कधी मिळणार पीएम किसान योजनेचा हप्ता? :
पीएम किसान योजनेचा हप्ता गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजेच जून महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण हा हप्ता जुलै महिना सुरू होऊन 5 दिवस झाले तरीही जमा झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 18 जुलै रोजी बिहार दौऱ्यावर आहेत. मोतीहारी येथे त्यांची सभा आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कळ दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात डिजिटल पद्धतीने पैसे जमा करण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे येत्या 18 जुलै रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या हप्त्यासाठी आजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
ही माहिती पहा –
Pik Vima Bharpai: पीक विमा भरपाईचे 3720 कोटी रुपये मिळणार, शेतकऱ्यांना मिळाले 3126 कोटी.
Kanda Lagwad Mahiti in Marathi: कांदा लागवड करण्याची उत्तम पद्धत; नक्कीच होईल फायदा
पीएम किसान योजेमद्धे नाव कसे चेक करावे
तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का?
जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव आहे का नाही. तर तुम्ही तुमच्या मोबाइल मधून हे चेक करू शकता. ते कशा पद्धतीने त्याची स्टेप पुढे दिली आहे.
- सगळ्यात अगोदर तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तिथे शेतकरी कॉर्नर हा पर्याय दिसेल या पर्यायावर जायचे आहे.
- त्यानंतर लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा.
- आणि “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.
अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही हे चेक करू शकता. जर तुमची KYC झाली असेल तर तुम्हाला तुमची रक्कम मिळण्यासाठी कसलीही अडचण येत नाही. आणि जर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास तुम्ही पुढे दिलेल्या नंबर वर तक्रार करू शकता.
हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. PM Kisan हेल्पलाईन 155261 वा 011-24300606 येथे कॉल करावा. या हेल्पलाइन नंबर वर कॉल केल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व अडचणीचे समाधान मिळेल.
पीएम किसान योजनेमद्धे आता कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार लाभ

कित्येक शेतकरी असे होते की एक कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लोक या योजनेचा लाभ घेत होते. पान आता पीएम किसान योजनेतंर्गत नियमात अजून एक मोठा बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार, कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच लाभ घेता येणार आहे.
आणि कुटुंबातील इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांविषयीच्या नियमात बदल झाले आहेत. ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या नवीन नियमबद्दल माहिती मिळेल.
आणि PM Kisan 20th Installment ची ही माहिती तुमच्या गावातील ग्रुप मध्ये नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना पण अशाच अपडेट मिळत राहतील. आणि शेतीबद्दल महत्वाची माहिती पाहण्यासाठी माझी शेती या आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.
ही महत्वाची अपडेट पहा :
Thank You!