Marathwada Weather Update: मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील 5 दिवस शेतकऱ्यांसाठी करावे हे…

Marathwada Weather Update News Marathi

Marathwada Weather Update: मित्रांनो मराठवाड्यात अनेक भागात वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काय करावे? तर याचा सल्ला वसंतराव नाईक कृषी विद्यापीठानं दिलेला आहे. त्याची सगळी माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

मित्रांनो जर शेतीबद्दल अशाच महत्वाच्या न्यूज हव्या असतील तर आपल्या माझी शेती व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा

माझी शेती ग्रुप जॉइन कराJoin Now

येणाऱ्या पुढच्या पाच दिवसामध्ये राज्यभरात पावसाला पोषक स्थिती तयार झाली असून मराठवाड्यात आजपासून 28 जूनपर्यंत पाऊस हजेरी लावणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्रानं सांगितलं आहे. आणि मराठवाड्यात अनेक भागात वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आणि मराठवाड्यात अनेक भागामध्ये पेरणीला सुरवात झाली आहे. काही भागामध्ये तर पेरणी होऊन 15 ते 20 दिवस उलटले आहे. Marathwada Weather Update

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व अपडेट साठी चॅनल Join Now

ही माहिती वाचा : Agri News Marathi: अहिल्यानगरचा शेतकरी जांभूळ शेतीतून मालामाल; कमावले एवढे रुपये

आणि काही भागामध्ये अजून पेरणी झाली नाहीये. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीच्या हलचाली कराव्यात की नाही? पीक व्यवस्थापन कसे करावे यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून कृषी हवामान आधारित कृषी सल्ला देण्यात आला आहे. Marathwada Weather Update

मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कसे?

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 व 25 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, दिनांक 26 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तसेच मराठवाडयात दिनांक 24 जून रोजी काही ठिकाणी तर दिनांक 25 व 26 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 27 व 28 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात जास्त तफावत आढळणार नाही. Marathwada Weather Update

फळबागेचे व्यवस्थापन कसे करावे

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी येणाऱ्या काही दिवसामध्ये फळबागेचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल ची माहिती पुढे पाहू शकता.

  • नवीन केळी बागेची लागवड करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. लागवडीच्या वेळेस शेणखत तर लागवडीनंतर 30 दिवसाने रासायनिक खत व्यवस्थापन करावे. 
  • केळी बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.नवीन आंबा लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. 
  • आंबा बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व रोगनाशकाची फवारणी करावी. Marathwada Weather Update
  • द्राक्ष बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते. द्राक्ष बागेतील वेलीची बांधणी करावी. द्राक्ष बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
  • नवीन सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. सिताफळ बागेत उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

शेतकऱ्यांनी हे करा

Marathwada Weather Update
Marathwada Weather Update

शेतकऱ्यांनी पुढील कामे करा असे कृषी विद्यापिठाची शिफारस आहे.

  • पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच कापूस पिकाची लागवड करावी. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. 
  • कापूस पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. लागवड केलेल्या कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. 
  • पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच तुर पिकाची पेरणी करावी. 
  • तुर पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. 
  • पावसाळ्यात तूर पिकावरील फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी, शेताच्या चारी बाजूस तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद चर काढावी जेणे करून अतिवृष्टी मध्ये शेतातील मातीची धूप होणार नाही व पिकाचे मुळे सडणार नाहीत. कारण आपण पाहतो की पाऊस जास्त प्रमाणात झाला तर तुरीचे झाडे जळतात. त्यामुळेपुढे चरातील पाणी पाऊस ओसरल्यावर शेतातील पिकास परत कामी येईल. 
  • पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर मूग/उडीद पिकाची अशा पिकांची पेरणी करावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. त्यामुळे पाऊस व्यवस्थित झाल्यावरच पेरणी करावी.
  • पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या मूग/उडीद पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच भुईमूग पिकाची पेरणी करावी.
  • भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. 
  • पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मका पिकाची पेरणी करावी. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते. पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पेरणी केलेल्या मका पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. Marathwada Weather Update
ही माहिती शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत. ज्यांची पेरणी अजून बाकी आहे किंवा जे फळबाग लावणार आहेत. आणि अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या माझी शेती वेबसाइट ला भेट देत जा.

ही माहिती वाचा :